Government Schemes

प्रत्यक्षात जेव्हा आपण आयुष्यामध्ये कष्ट करून पैसा कमवतो आणि त्याची बचत करतो. यामागे प्रत्येकाचे काही निश्चित हेतू असतात. यामध्ये मुलाबाळांचे शिक्षण, दैनंदिन कौटुंबिक चरितार्थ चालवण्यासाठी लागणारा पैसा, अचानक येणाऱ्या आरोग्याच्या समस्या आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःचा वृद्धापकाळ आर्थिक दृष्ट्या सुरक्षित कसा राहील याकडे सगळ्यांचे लक्ष असते.

Updated on 23 September, 2022 1:34 PM IST

प्रत्यक्षात जेव्हा आपण आयुष्यामध्ये कष्ट करून पैसा कमवतो आणि त्याची बचत करतो. यामागे प्रत्येकाचे काही निश्चित हेतू असतात. यामध्ये मुलाबाळांचे शिक्षण, दैनंदिन कौटुंबिक चरितार्थ चालवण्यासाठी लागणारा पैसा, अचानक येणाऱ्या आरोग्याच्या समस्या  आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःचा वृद्धापकाळ आर्थिक दृष्ट्या सुरक्षित कसा राहील याकडे सगळ्यांचे लक्ष असते.

त्यासाठी विविध प्रकारच्या गुंतवणूक योजना आहेत व बरेचजण गुंतवणूक योजनांचा फायदा देखील घेतात. जीवनाच्या या सगळ्या काळामध्ये जेव्हा सेवानिवृत्ती होते. तो कालावधी आर्थिक सुरक्षा आणि आणि स्थिरतेच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण असतो.

त्यामुळे आताच चांगल्या योजनांचा फायदा घेणे खूप गरजेचे असते. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर तुम्हाला तुमच्या पत्नीचे पुढील भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करायचे असेल तर त्यासाठी फायदेशीर असलेल्या योजने बद्दल आपण माहिती घेऊ.

नक्की वाचा:Health Tips: सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी 'असा'असावा आहार,आरोग्य राहिल ठणठणीत

 पत्नीच्या नावाने उघडा 'एनपीएस' खाते

 यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अर्थात एनपीएस खाते उघडू शकतात. या खात्याचा फायदा असा होतो की तुमच्या पत्नीला साठ वर्ष पूर्ण झाल्यावर एकरकमी रक्कम मिळण्यास मदत होते

व एवढेच नाहीतर प्रतिमाह पेन्शनच्या स्वरूपात नियमित उत्पन्न देखील मिळायला चालू होते. यामध्ये करायच्या गुंतवणुकीचा विचार केला तर  ते खूप सुलभ असून तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वार्षिक बेसवर आधारित पैसे जमा करू शकतात.

विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर फक्त एक हजार रुपयांमध्ये एनपीएस खाते उघडू शकतात. या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी हा वयाच्या साठाव्या वर्षी आहे. जर आता नवीन नियमाचा विचार केला तर तुम्ही तुमच्या पत्नीचे वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत हे खाते सुरू ठेवू शकता.

नक्की वाचा:Post Office Scheme: पोस्टाच्या 'या'योजनेत गुंतवणूक केल्यास मिळतात 5 वर्षात 1 लाख रुपये, वाचा माहिती

 या माध्यमातून किती मिळते मासिक उत्पन्न?

उदाहरणच घ्यायचे झाले तर समजा तुमच्या पत्नीचे वय 30 वर्षे असेल आणि तुम्ही त्यांच्या एनपीएस खात्यात दर महिन्याला पाच हजार रुपये गुंतवणूक करत असाल तर त्याला वार्षिक गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा मिळत असेल

तर वयाच्या साठव्या वर्षी त्यांच्या खात्यात एकूण एक कोटी बारा लाख रुपये जमा होतील व एवढेच नाही तर त्यांना दरमहा पंचेचाळीस हजार रुपये पेन्शन मिळू लागेल व हा पेन्शनचा लाभ त्यांना संपूर्ण आयुष्यभर मिळत राहील. विशेष म्हणजे या योजनेवर जो काही परतावा मिळतो त्यामध्ये गृहिणींसाठी करातून सूट मिळते.

नक्की वाचा:Important: 'ही' बँक देत आहे शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांची मदत, वाचा नेमकी काय आहे योजना?

English Summary: open an account your wife in national pension system and get benifit to pension
Published on: 23 September 2022, 01:34 IST