सध्या कांदा बाजारभाव (Onion market price) शेतकऱ्यांना संकटात टाकणारा ठरत आहेत. भारतात (india) कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र कांद्याला कवडीमोल दर मिळत आहे.
अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने (government) केंद्राला नाफेडमार्फत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची मागणी केली आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री (Minister of Food and Public Distribution) पियूष गोयल यांना मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत पत्र लिहिले आहे.
आनंदाची बातमी! गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ९८ कोटी रुपयांची मदत जाहीर
कांद्याचे दर पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. केंद्र सरकारनं आपल्या नॅशनल अॅग्रीकल्चर (National Agriculture) कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) मार्फत २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
सावधान! ॲसिडिटीचा सतत त्रास होतोय? तर हृदयविकाराची असू शकतात लक्षणे...
२० लाख मेट्रिक टन अधिक उत्पादन
कांदा हे महाराष्ट्रातील महत्वाचं नगदी पीक आहे. भारतात कांद्याचं ३५ ते ४० टक्के उत्पादन होतं. चांगल्या पावसामुळं १३६.७० लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज २०२१-२२ मध्ये वर्तवण्यात आला होता. यानुसार गेल्या हंगामापेक्षा २० लाख मेट्रिक टन अधिक आहे.
महत्वाचे म्हणजे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याने कांद्याचा बाजारभाव (market price) कोसळला आहे. त्यामुळं कांदा उत्पादकांमध्ये निराशेचं आणि चिंतेच वातावरण पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
महत्वाचे! PM आवास योजनेअंतर्गत घर मिळाले नसेल तर 'या' नंबरवर करा कॉल
शेतकरी मित्रांनो वासरांची वाढ 'या' कारणाने खुंटते; घ्या अशी काळजी
राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती मिळतोय सोयाबीनला भाव? जाणून घ्या
Published on: 15 September 2022, 04:19 IST