भारत हा कृषिप्रधान देश आहे त्यामुळे आपल्या देशातील मुख्य व्यवसाय सुद्धा शेतीच आहे. शेतकरी वर्गावर संकटाची मालिका ही कायमच आपल्याला दिसून येते. अनेक वेगवेगळ्या कारणामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. या मध्ये पाऊस, अतिवृष्टी, वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
शेतातील पिकानां योग्य प्रमाणत सर्व गोष्टी वेळेत मिळणे खूप गरजेचे असते बऱ्याच वेळा पिकांना पाणी न मिळाल्यामुळे पिके जळून जातात तर काही वेळेस जास्त पाणी झाल्यामुळे पिके रानातच सडून जातात त्याचबरोबर रोगराई सुद्धा असतेच यामुळे शेतकरी वर्गाला सतत अडचणींना सामोरे जावे लागते.
आता केंद्र सरकार ने सर्व शेतकरी वर्गाच्या हितासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेच्या अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात विमा संरक्षण देणं हे पीएम पीक विमा योजनेचं प्रमुख धोरण आहे.
विम्याचा लाभ कसा घ्यावा:-
या योजनेचा लाभ देशातील प्रत्येक राज्यांतील शेतकरी घेऊ शकतात. या साठी तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरावा लागतो जर का आपणास ऑनलाइन अर्ज भरायचा असेल, तर ते पीएम पीक विमा योजनेच्या https://pmfby.gov.in या संकेस्थळावर जाऊन अर्ज भरू शकता. आणि जर का तुम्हाला ऑफलाइन अर्ज भरायचा असेल तर नजीकच्या बँक, सहकारी संस्था किंवा CSC ला भेट देऊन अर्ज भरू शकता. शेतकर्यांनी पेरणी केल्यानंतर अवघ्या 10 दिवसांच्या आत विम्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्ही विमा रक्कम मिळवण्यासाठी पात्र ठरू शकता.
अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे -
अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे रेशनकार्ड, आधारशी लिंक केलेला बँक खाते क्रमांक, ओळखपत्र, शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो, शेताचा गट क्रमांक, शेतकऱ्याचे रहिवासी दाखला, शेत असल्यास भाड्याने घेतल्यास कराराची झेरॉक्स या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आणि महत्वाचे असते.
हेही वाचा:-शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल करा कमी, दैनंदिन आहारात करा या पदार्थांचा समावेश.
Published on: 01 September 2022, 12:24 IST