शासनाच्या विविध पद्धतीच्या योजना वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगधंद्यांसाठी म्हणा किंवा शेतीसाठी असतात. परंतु बऱ्याचदा असे होते की, संबंधित योजनांसाठी असलेल्या अटी व पात्रता या इतक्या अवघड असतात की त्या पूर्ण करणे म्हणजे नको ती योजना अशा प्रकारची भावना मनात यायला लागते.
त्यामुळे इच्छुक असलेल्या व्यक्तींना देखील खूप प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागतो. अशीच एक फायदेशीर योजना मध्ये प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग ही होय. तसे पाहायला गेले तर केंद्राच्या अनेक योजनांमध्ये अडचणी येत असल्याने अशा योजनांचा लाभ घेता येत नव्हता.
यामध्ये बऱ्याचदा पात्र होण्याची वा कर्ज न मिळणे, एकात्मिक अन्नसाखळीचा अभाव किंवा आरोग्य व सुरक्षितता मानांकनाची समस्या या व इतर प्रकारच्या अनेक अडचणी होत्या.
परंतु आता यामध्ये सुधारणा करून प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना राबवण्यासाठी राज्यांनी मान्यता दिली आहे. एवढेच नाही तर यामध्ये आता केंद्राच्या काही सुधारित अटी टाकण्यात आल्याने पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
नक्की वाचा:महत्वाचे! 'या' योजनेअंतर्गत सामूहिक शेततळ्यासाठी शंभर टक्के अनुदान, वाचा सविस्तर माहिती
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचे स्वरुप
या योजनेमध्ये ' एक जिल्हा एक उत्पादन' ही अट रद्द करण्यात आली असून या व्यतिरिक्त नवीन प्रक्रिया उद्योग सुरू करता येणार आहे. बेकरी व कन्फेशनरी स्नॅक्स,लोणची, विविध पापड मसाले तसेच रेडी टू इट व रेडी टू कूक यासारखे उद्योग सुरु करण्यासाठी आणि जे काही उद्योग सुरू आहेत त्यांच्या विस्तारीकरणासाठी या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना आता मिळणार आहे.
या योजनेचा लाभ कुणाला मिळतो?
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ हा वैयक्तिक मालकी, भागीदारी शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी स्वयंसहायता गट व सहकारी उत्पादक संस्था,बेरोजगार युवक, महिला व प्रगतिशील शेतकरी यामध्ये सहभागी होऊ शकतात.
या योजनेचा लाभ कितपत मिळतो?
या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक सूक्ष्म उद्योगाला व उपक्रमांना प्रकल्पाच्या 35% जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत क्रेडिट लिंक सबसिडी आधारावर अनुदान मिळणार आहे. यामध्ये जमिनीची किंमत तसेच भाडेपट्टी, लिजवरील शेडचा समावेश केलेला नाही. या योजनेच्या माध्यमातून तांत्रिक बांधकामासाठी
कमाल 30 टक्के लाभ देय आहे.या बांधकामामध्ये कंपाऊंड, संबंधित कार्यालय व मजुरांची घरे, उत्पादन व प्रक्रियेशी संबंधित नसलेले इतर बांधकाम ग्राह्य धरण्यात येणार नाही.
तसेच या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पूर्वी आठवी पास असणे गरजेचे होते परंतु ही अट रद्द करण्यात आली आहे.
अर्ज कुठे करावा?
ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी www.pmfme.mofpi.gov.in या पोर्टलवर अर्जदाराने किंवा जिल्हा संसाधन व्यक्ती मार्फत ऑनलाईन अर्ज करावा.
नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो आता घराच्या छतावरच तयार करा वीज; सरकार देतंय 50 हजारांपर्यंत अनुदान
Published on: 04 September 2022, 01:37 IST