आताचा गुंतवणुकीचा निर्णय निवृत्तीनंतर म्हणजेच तुमच्या वृद्धापकाळात तुमचे आर्थिक सुरक्षितता आणि तुमचे जीवन कसे राहील हे ठरवत असतो. बरेच जण आयुष्याच्या उतारवयामध्ये केलेली गुंतवणूक कामात यावी हा त्यामागचा उद्देश असतो.
बरेच जण वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतवतात. निवृत्तीनंतर जर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या भक्कम आणि स्वावलंबी व्हायचे असेल तर एनपीएस म्हणजेच नॅशनल पेंशन प्रणाली योजना खूप महत्त्वपूर्ण आहे. या लेखात आपण याबद्दल माहिती घेऊ.
राष्ट्रीय पेंशन प्रणाली अर्थात एनपीएस नेमके काय?
नॅशनल पेन्शन प्रणाली मध्ये खाते उघडून तुम्ही गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या योजनेमध्ये जर तुम्ही महिन्याकाठी 5000 रुपये गुंतवत गेलात तर तुम्हाला एकरकमी 36 लाख यांसह प्रतिमहिना पन्नास हजार पेन्शन मिळू शकते.
या योजनेमध्ये वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला एकरकमी रक्कम देण्यात येते. एवढेच नाही तर तुम्हाला पेन्शन च्या रूपात प्रतिमहिना एक भक्कम उत्पन्न देखील मिळते. राष्ट्रीय पेंशन प्रणाली अर्थात एनपीएस एक सरकारी पेन्शन योजना आहे.
नक्की वाचा:सरकारचे हे कार्ड शेतकऱ्यांचे उत्पन्न करणार दुप्पट, शेतकऱ्यांनो जाणून घ्या सर्व माहिती
'या' योजनेचे फायदे
तुम्ही तुमच्या एनपीएस खात्यामध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला अनेक प्रकारचे पर्याय मिळतात जसे की, तुम्ही पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळेल, हे तुम्ही दर महिन्याला किंवा वार्षिक बेसवर एनपीएस मध्ये पैसे जमा करून ठरवू शकता.
या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड साठ वर्षे असून ती 65 वर्षे वयापर्यंत चालू ठेवता येते. या योजने मधील एक वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही या योजनेत केलेली गुंतवणूक ही तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आहे. या योजनेचा मॅच्युरिटी पिरियड 60 वर्षे आहे.
परंतु काही विशिष्ट परिस्थिती उद्भवली तर तुम्ही साठ वर्षाच्या अगोदर देखील पैसे काढू शकता. तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून पेंशनच्या स्वरूपात प्रतिमाह चांगले नियमित उत्पन्न देखील मिळते.
नक्की वाचा:पीएम कुसुम योजनेत फक्त 10 टक्के गुंतवणूक करा आणि कमवा लाखों रुपये; सरकार देतंय अनुदान
अतिरिक्त कर वाचतो
काही करदात्यांना अधिकचा कर वाचवायचा असतो त्यांनी एनपीएस मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. या योजनेत गुंतवणूक केल्यावर करदात्यांना वार्षिक दीड लाख रुपयांच्या व्यतिरिक्त 50 हजार रुपयांचे अधिक करसवलत मिळते.
Published on: 25 July 2022, 12:47 IST