शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा १४ वा हप्ता मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० एप्रिल २०२३ च्या आधी लाभार्थी शेतकऱ्यांनी बँक खाते क्रमांक आधारला जोडून घ्यावं.
दरम्यान, फेब्रुवारी २०२३ दरम्यान १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. त्यानंतर एप्रिल ते जुलै महिन्याच्या दरम्यान १४ वा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र मे महिन्यात १४ वा हप्ता जमा होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
यामध्ये सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना दर तीन महिन्याला २ हजार रुपये रक्कम देण्यात येते. म्हणजे वर्षभरात ६ हजार रुपये तीन टप्प्यात देण्यात येतात. दरम्यान 14 व्या हप्त्यासाठी ई केवायसी (PM Kisan Status KYC) करून घ्यावी.
पुढचे चार दिवस अतिमहत्वाचे, महाराष्ट्रात पाऊस थैमान घालणार..
तसेच भूमी अभिलेख नोंदी पोर्टलवर अपडेट कराव्यात असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. कृषी आयुक्त सुनील चव्हाण पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे महाराष्ट्र राज्य अंमलबजावणी प्रमुख आहेत.
खाद्य तेलाचे दर वाढणार की कमी होणार, जाणून घ्या..
आजवर या योजनेचे १३ हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांचा खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना आता १४ व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे. याचा शेतकऱ्यांना काहीसा फायदा होत आहे.
दुःखद! वीज कोसळून अख्ख शेतकरी कुटुंब ठार
खाद्य तेलाचे दर वाढणार की कमी होणार, जाणून घ्या..
बंपर कमाई! याठिकाणी शेतकरी एका खास पद्धतीने भेंडी पिकवतात, दर 100 रुपये किलो, जाणून घ्या..
Published on: 26 April 2023, 05:08 IST