Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना (farmers scheme) राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Updated on 18 October, 2022 11:33 AM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना (farmers scheme) राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

काल नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे आयोजित किसान सन्मान संमेलनात (Kisan Samman Samelan) देशातील 3.3 लाख किरकोळ खत दुकानांचे प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र मध्ये रूपांतर करण्याची घोषणा केली आहे. मोदींच्या या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ही दुकाने टप्प्याटप्प्याने पीएमकेएसकेमध्ये (pmksk) बदलण्यात येणार आहेत. या केंद्रांवर एकाच छताखाली बियाणे, खते आणि मातीच्या चाचणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे याशिवाय या केंद्रांवर शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित गोष्टींची माहिती करून दिली जाणार आहे.

दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; वारणा सहकारी दूध संघाकडून मिळणार ५४ कोटी रुपये

शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजना त्यांना सांगण्यात येणार आहेत. जिल्हा स्तरावर किमान एका किरकोळ दुकानाला मॉडेल शॉप म्हणून विकसित केले जाईल, अशी सरकारची योजना आहे. माहितीनुसार या अंतर्गत जवळपास 3,30,499 किरकोळ खतांची दुकाने पीएमकेएसकेमध्ये रूपांतरित केली जातील.

दिलासादायक! पहिल्या टप्प्यात 37 हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ

600 नवीन पीएम किसान समृद्धी केंद्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 600 नवीन पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन केले. या केंद्रांवर केवळ खतच उपलब्ध होणार नाही. तर बियाणे, उपकरणे, माती परीक्षण आणि शेतकऱ्याशी संबंधित सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

महत्वाचे म्हणजे ही केंद्रे वन स्टॉप शॉप (One stop shop) म्हणून विकसित केली जाणार आहेत. सध्या खताची दुकाने उत्पादक कंपन्यांच्या डीलर नेटवर्कद्वारे चालविली जातात, परंतु त्याठिकाणी शेतीशी संबंधित प्रत्येक सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना लागणारा माल घेण्यासाठी 2-3 वेगवेगळ्या दुकानांच्या फेऱ्या माराव्या लागतात. या निर्णयाने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 
धक्कादायक! पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याकडे पैशांची
पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; हरभरा आणि गहू बियाणे अनुदानावर मिळणार
Horoscope: येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य

English Summary: Modi government Seed fertilizer soil testing facility available one place
Published on: 18 October 2022, 11:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)