केंद्र आणि राज्य सरकार (central and state government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवते, ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ घेता येईल. आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी (farmers) एका दिलासादायक योजनेबाबद आवाहन केले आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
राष्ट्रीय कृषी विकास प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Agriculture Irrigation Scheme) सन २०२२-२३ अंतर्गत अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करुन सुक्ष्म सिंचनाचा लाभ घ्या, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी शेतकऱ्यांना प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
Goat Rearing: शेळी पालनातून शेतकरी होतील करोडपती; फक्त अशी करा शेळयांची निवड
राष्ट्रीय कृषी विकास (National Agricultural Development) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत लाभार्थीं शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचनेनुसार अल्प व अत्यल्प भूधारक यांना ५५ टक्के व बहुभूधारक यांना ४५ टक्के अनुदान देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतंर्गत अतिरिक्त २५ टक्के व ३० टक्के पूरक अनुदान देण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे.
Mineral Mixture: दुधाळ जनावरांना द्या खनिज मिश्रण; दुधाच्या उत्पादनात होईल वाढ
कागदपत्रे
अर्ज करतांना शेतकऱ्यांच्या (farmers) मालकीचा ७/१२, ८अ, आधार कार्ड व बँक पासबुक सोबत असणे आवश्यक आहे. या योजनेबाबद काही समस्या असल्यास अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी व ग्राहक सेवा केंद्रावर संपर्क साधावा.
महत्वाच्या बातम्या
Horoscope: 21 ऑगस्टपासून 'या' राशीच्या लोकांना होणार मोठा धनलाभ; वाचा तुमचे राशीभविष्य
Post Office Scheme: पोस्टाची 'ही' योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; 5 वर्षात मिळणार 14 लाख रुपये
Farmer Award: शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मिळणार पुरस्कार; करा असा अर्ज
Published on: 20 August 2022, 09:36 IST