Government Schemes

शेती आणि शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकरी राजा शेतामध्ये अहोरात्र कष्ट करून अनमोल असा शेतमाल उत्पादित करतात. परंतु बाजारपेठेमध्ये बऱ्याचदा शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल दराने विकला जातो.त्यामुळे नैराश्याने शेतकरी घेरले जातात.

Updated on 18 July, 2022 7:12 PM IST

शेती आणि शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकरी राजा शेतामध्ये अहोरात्र कष्ट करून अनमोल असा शेतमाल उत्पादित करतात. परंतु बाजारपेठेमध्ये बऱ्याचदा शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल दराने विकला जातो.त्यामुळे नैराश्याने शेतकरी घेरले जातात.

ही जी काही समस्या आहे,  ती कायमच आहे. शेतकर्‍यांनी कष्टाने पिकवलेल्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी शासन देखील विविध प्रकारचे प्रयत्न करत असते.

याचाच एक भाग म्हणून विचार केला तर शेतकऱ्यांचा शेतमाल देशातील कुठल्याही बाजारपेठेत जलद गतीने पाठवण्यासाठी शासनाने 'कृषी उडान योजना' 2.0 सुरु केली आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल हवाई मार्गाद्वारे जलद वाहतुकीच्या माध्यमातून देशाच्या विविध बाजारपेठेत पोचवता येणं शक्य झाले.

या योजनेमध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला असून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी व शेती उत्पादक कंपन्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे. याबाबतची माहिती शासकीय प्रसिद्धी पत्रक जारी करून देण्यात आली आहे.

नक्की वाचा:गोगलगायीने वाढवले शेतकऱ्यांचे टेन्शन; पाहणी करण्यासाठी माजी मंत्री थेट शेतीबांधावर

आपल्या देशातील जवळजवळ साठ टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासन स्तरावर हमीभाव योजना राबवण्यात येत असून विमानात आरक्षित करण्यात आलेल्या निम्म्या जागा करता अनुदान दिले जाणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून कृषी उत्पादने, फलोत्पादन,  दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस, मासे यासारख्या व्यवसाय संबंधीची विमानाने वाहतूक करणे सोपे होणार आहे.

देशातील 53 विमानतळांचा आहे या योजनेत समावेश

 या योजनेच्या माध्यमातून देशातील 53 विमानतळे एकमेकांना जोडण्यात आली असून याबाबतची धोरणात्मक निवड ही साधने क्षेत्रावर केंद्रित करण्यात आली आहे.

शेतमाल पिकवल्यानंतर तो जास्त वेळ साठवून ठेवता येत नाही. म्हणून त्याचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाऊ नये म्हणून होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांच्या मालाची संरक्षण करण्यासाठी आणि योग्य वेळी शेती उत्पन्न बाजारात देण्यासाठी कृषी उडान योजना उपयोगी ठरणार आहे.

नक्की वाचा:आनंदाची बातमी! अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपदामुळे पिकाचे नुकसान झाले तर सरकार नुकसान भरपाई देणार; वाचा सविस्तर

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारताचा कायमचा रहिवासी असावा.

2- अर्जदार हा शेतकरी असावा. त्याने शेती संबंधित कागदपत्रे दाखवणे बंधनकारक आहे.

3-अर्जदाराने आधार कार्ड,रेशन कार्ड, स्वतःचा मोबाईल क्रमांक तसेच रहिवासी दाखला इत्यादी आवश्यक आहे

 या योजनेसाठी ई कुशल नावाने ऑनलाइन पोर्टल कृषी उडान 2.0 चा भाग म्‍हणून विकसित करण्‍यात येणार असून या पोर्टलच्या माध्यमातून या योजनेचे समन्वय देखरेख आणि मूल्यमापन करण्यात येणार आहे.

 देशातील या विमानतळावर सुविधा

 उत्तर पूर्व भाग तसेच आदिवासी आणि डोंगरात जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा सरकारचा एक भाग म्हणून बागडोग्रा आणि गुवाहाटी विमानतळ,नाशिक,नागपूर,श्रीनगर, रायपूर आणि रांची या विमानतळावर एअर साईड ट्रान्झिट आणि ट्रान्स शिपमेंट पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.

नक्की वाचा:आता होईल उसाची अचूक नोंद! उसाचे नोंदणी होणार आता 'ॲप'वर, साखर हंगामाचे देखील होईल व्यवस्थित नियोजन

English Summary: krushi udaan yojana is so benificial for farmer and farms goods
Published on: 18 July 2022, 07:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)