आज राज्य शासनाने शासन निर्णय काढून राज्य सरकारी कर्मचाऱ्यासाठी चार टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचारी खुश आहेत. अनेक राज्यांनी देखील असा निर्णय घेतला आहे.
मागील अनेक दिवसांपासून हा भत्ता वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढवला जातो. आज वित्त विभागाने शासन निर्णय काढून महागाई भत्ता वाढवण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.
राज्याचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के करण्यात आलेला आहे. २५ मार्च रोजी राजस्थानच्या गहलोत सरकारने राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठं गिफ्ट दिलं होतं. या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ करण्यात आलेली होती.
समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता, केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
कर्नाटक सरकारनेदेखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये वाढ केली होती. केंद्राने ३ एप्रिल २०२३ रोजी महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामधअये ४ टक्के वाढ केली होती.
सुक्या चाऱ्याची योग्य साठवण कशी करावी जाणून घ्या..
डीए आणि डीआरएमध्ये ही वाढ जानेवारी २०२३ पासून लागू झाली. मोदी सरकारच्या कॅबिनेटने घेतलेल्या या निर्णयानंतर महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के झाला आहे.
शेतकऱ्यांसह पशुखाद्य उत्पादक कंपनीचा समितीत समावेश, आता तरी दूध उत्पादक शेतकऱ्यांना परवडणार का?
जगातील सगळ्यात महागडी गाय भारताची, किंमत १४ लाख ४० हजार डॉलर...
रुंद वरंबा व सरी पद्धतीमुळे पावसाचे पाणी मुरते, पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पिकांची लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने केल्यास फायदेशीर
Published on: 30 June 2023, 11:30 IST