सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना (farmers) आर्थिक दिलासा मिळतो. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील 1 लाख 74 हजार 610 शेतकऱ्यांना तब्बल 1 हजार 557 कोटी रुपयांचे कर्जपुरवठा (Loan supply) करण्यात आला आहे.
महितीनुसार निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या 65 टक्के कर्जपुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे 35 टक्के कर्जपुरवठा केवळ प्रतिक्षेत राहिला आहे.
राष्ट्रीयीकृतसह खासगी बँकांनी उद्दिष्टाकडे कानाडोळा केल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (bank) सर्वाधिक 1014 कोटी रुपयांचे कर्ज दिले. तर राष्ट्रीयीकृत बँकांनी अवघे 42 टक्के म्हणजे 338 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला.
मुसळधार पावसामुळे हजारो क्विटंल लाल मिरचीचे नुकसान; शेतकऱ्यांना मोठा फटका
बँकांकडून निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या ६५ टक्के कर्जपुरवठा
जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेसह, राष्ट्रीयीकृत (Nationalized), ग्रामीण बँकांना 2849 कोटी उद्दिष्ट देण्यात आले आहे. निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या 65 टक्के कर्जपुरवठा करण्यात आला. जिल्ह्यातील 1 लाख 74 हजार 610 शेतकऱ्यांना 1557 कोटी रुपये कर्जपुरवठा करण्यात आला आहे.
उद्दिष्टपूर्तीकडे राष्ट्रीयीकृतसह खासगी बँकांनी उद्दिष्टाकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले. यंदाच्या खरीप हंगामासाठी सांगलीत जिल्हा मध्यवर्ती बँकेला 1436 कोटींचे उद्दिष्ट होते, त्यांच्याकडून 1 लाख 36 हजार 242 शेतकऱ्यांना 1014 कोटी रुपये कर्जपुरवठा करण्यात आला. त्याची टक्केवारी सर्वाधिक म्हणजे 75 टक्के केला आहे.
LIC जीवन उमंग पॉलिसी: दररोज फक्त 45 रुपये गुंतवा आणि मिळवा 36 हजार रुपयांचा लाभ
जिल्ह्यातील ग्रामीण बँकांनी 413 कोटींचे उद्दिष्ट असताना 470 कोटीचा कर्जपुरवठा केला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना 775 कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते, परंतू त्यांच्याकडून अवघ्या 32 हजार 347 शेतकऱ्यांना 338 कोटी रुपये कर्जवाटप (Loan supply) झाले. खासगी व व्यापारी बँकांना 506 कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात 199 कोटी म्हणजे केवळ 39 टक्के कर्जपुरवठा केला आहे.
खरीप हंगामातील बँकांचे कर्जवाटप
जिल्हा बँक 1014 कोटी 64 टक्के
खासगी 199 कोटी 39 टक्के
राष्ट्रीयीकृत 338 कोटी 42 टक्के
ग्रामीण 4.70 कोटी 112 टक्के
एकूण 1557 कोटी 65 टक्के
महत्वाच्या बातम्या
सर्वसामान्यांना मोठा फटका! दिवाळीच्या तोंडावर डाळीं आणि खाद्यतेलाच्या किमतीत वाढ
12 वर्षानंतर वृषभ, मिथुन, कर्क राशीच्या लोकांना धनलाभाचा योग; राशीभविष्य काय सांगतंय? जाणून घ्या
सावधान! तुमच्या 'या' एका सवयीमुळे जीवाला होऊ शकतो धोखा; वेळीच घ्या काळजी
Published on: 10 October 2022, 10:28 IST