Government Schemes

पीएम आवास योजनेअंतर्गत गरिबांना घरे देण्याची सुविधा केंद्र सरकारने सुरू केली होती. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) सरकार देशातील गरीब आणि गरजूंना घरे देते. मात्र बऱ्याच लोकांना अर्ज करूनही घरे मिळाली नाहीत. तर यावर पर्याय काय? याविषयी माहिती घेणार आहोत.

Updated on 15 September, 2022 3:20 PM IST

पीएम आवास योजनेअंतर्गत गरिबांना घरे देण्याची सुविधा केंद्र सरकारने सुरू केली होती. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (PM Awas Yojana) सरकार देशातील गरीब आणि गरजूंना घरे देते.

मात्र बऱ्याच लोकांना अर्ज करूनही घरे मिळाली नाहीत. तर यावर पर्याय काय? याविषयी माहिती घेणार आहोत. ही योजना केंद्र सरकारने (central government) 2015 मध्ये सुरू केली होती. या योजनेंतर्गत सरकारने २०२२ पर्यंत झोपडपट्टी, कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरे देण्याचा निर्णय घेतला होता.

विशेष म्हणजे यासोबतच शासनाकडून या योजनेत अनुदानाची सुविधाही दिली जाते. शहरी गृहनिर्माण योजनेत 2.67 लाख रुपये तर ग्रामीण गृहनिर्माण योजनेत 1.67 लाख रुपये अनुदान दिले जाते. मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही कॉल करून तक्रार करू शकता.

शेतकऱ्यांनो 'या' योजनेतून दरमहा मिळवा 3 हजार रुपये; सरकार देतंय पेन्शन

या क्रमांकांवर तुम्ही तक्रार करू शकता

राज्यस्तरीय टोल फ्री क्रमांक - 1800-345-6527
मोबाईल नंबर किंवा व्हॉट्सअॅप नंबर - 7004-19320
ग्रामीण - 1800-11-6446
NHB (NHB, अर्बन) - 1800-11-3377, 1800-11-3388
हुडको - 180011-6163

माहितीनुसार जेव्हा तुमची तक्रार नोंदवली जाईल तेव्हा तुमची तक्रार ४५ दिवसांच्या आत निकाली काढली जाईल. याशिवाय अधिक माहितीसाठी तुम्ही ब्लॉक विकास (block vikas) अधिकारी यांच्याशीही संपर्क साधू शकता.

आनंदाची बातमी! गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ९८ कोटी रुपयांची मदत जाहीर

या योजनेचे लाभार्थी लोक

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (pm aavas scheme) तीन लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेली कोणतीही व्यक्ती ज्यांच्याकडे कोणतेही घर नाही त्यांना याचा लाभ घेता येईल. यासाठी 2.50 लाखांची मदत दिली जाते.

यामध्ये तीन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात. पहिला हप्ता 50 हजार तर दूसरा हप्ता 1.50 लाख रुपये आणि तिसरा हप्ता 50 हजार असा दिला जातो. राज्य सरकार एकूण 2.50 लाखांसाठी 1 लाख देते आणि केंद्र सरकार 1.50 लाख अनुदान देते.

महत्वाच्या बातम्या 
शेतकरी मित्रांनो वासरांची वाढ 'या' कारणाने खुंटते; घ्या अशी काळजी
राज्यातील बाजार समित्यांमध्ये किती मिळतोय सोयाबीनला भाव? जाणून घ्या
सावधान! ॲसिडिटीचा सतत त्रास होतोय? तर हृदयविकाराची असू शकतात लक्षणे...

English Summary: Important Call number got house under PM Awas Yojana
Published on: 15 September 2022, 03:08 IST