नवी दिल्ली : शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Sanman Nidhi) योजना सुरु केली आहे. केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना (Farmers) दर वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. पीएम किसान सन्मान निधी याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना प्रत्येकी वीस हजार अर्थात 10 हप्ते देण्यात आले आहेत. देशातील एकूण अकरा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे राज्यातील देखील एक कोटी पाच लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
पीएम किसान सन्मान निधी या योजनेशी संबंधित शेतकऱ्यांना सरकार दरमहा 3000 रुपये म्हणजेच 36000 रुपये पेन्शन (Pension) म्हणून देत आहे. या योजनेचा लाभ अशा शेतकऱ्यांना दिला जाईल. ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते, ज्या अंतर्गत वार्षिक 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये खात्यात येतात.
ठरलं तर! पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता 'या' तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार
मोदी सरकारच्या या योजनेचा लाभ त्या सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो जे पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत. त्याच वेळी, 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत आहेत.
उन्हाळ्यात दुभत्या म्हशींचे व्यवस्थापन...
अटी जाणून घ्या..
१. पीएम किसान मानधन योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन देण्याची योजना आहे.
२. यामध्ये वयाच्या ६० नंतर प्रत्येक महिन्याला ३००० रुपये म्हणजेच वार्षिक ३६००० रुपये पेन्शन दिले जाते.
३. जर एखादा शेतकरी पीएम-किसान सन्मान निधीचा लाभ घेत असेल तर त्याला पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाही.
४. किसान मानधन योजनेअंतर्गत 18-40 वर्षांपर्यंतचा कोणताही शेतकरी यामध्ये नोंदणी करू शकतो.
५. मात्र, ज्यांच्याकडे जास्तीत जास्त 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन आहे तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
६. त्यांना किमान 20 वर्षे आणि कमाल 40 वर्षे या योजनेंतर्गत 55 ते 200 रुपये मासिक योगदान द्यावे लागेल.
७. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी सामील झालात तर मासिक योगदान दरमहा 55 रुपये असेल.
८. जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर दरमहा 110 रुपये द्यावे लागतील.
Published on: 05 May 2022, 12:41 IST