Government Schemes

सध्या राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसानिस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता पिकविमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Updated on 19 July, 2022 3:29 PM IST

सध्या राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसानिस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता पिकविमा योजनेसंदर्भात शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. विमा हप्ता भरताना ई-पीक पाहणीची अटच रद्द करण्यात आली आहे.

मागच्या वर्षी पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रक्रिया करत असताना आपण ई-पीक पाहणी केली आहे, असा अहवाल सादर करावा लागत होता. काही अडचणींमुळे शेतकरी लाभ घेण्यापासून वंचित राहत होते. पण आता तशी गरज भासणार नाही, पीक पाहणीमध्ये केलेली पिकांची नोंद हीच अंतिम गृहीत धरली जाणार आहे. त्यामुळे मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी अटीमुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू शकणार नाहीत.

🏍️ बाईक खरेदी करताय? तर नितीन गडकरींची ही मोठी घोषणा पहाच; होईल मोठा फायदा...

आतापर्यंतच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांचा सहभाग वाढेल असा अंदाज वर्तविला जात आहे. पेरण्या लाबल्याने आतापर्यंत फक्त १३ लाख शेतकर्‍यांनी योजनेत सहभाग नोंदवला आहे, परंतु ही संख्या वाढेल असा आशावाद कृषी विभागाला आहे. पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही ३१ जुलै आहे.

💁🏻‍♂️ शेतकऱ्यांना तातडीने 50 हजार रुपये द्या ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकनाथ शिंदेंकडे मागणी

दिलासादायक बाब म्हणजे शासनाने विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी अनिवार्य ही अटच आता वगळली आहे. विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही ३१ जुलै आहे, तर १ ऑगस्टपासून पीक पेर्‍याची नोंदी घेण्याचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पीक पाहणीची नोंद सक्तीची असल्याबाबत संभ्रम कायम होता. मात्र, प्रत्यक्ष सहभाग घेतानाचे पीक आणि पाहणीच्या वेळीचे पीक यामध्ये तफावत असल्याचे मत कृषी विभागाने मांडले आहे.


🤩 'या' योजनेत दरमहिना फक्त 210 रुपये जमा करा आणि मिळवा 5,000 रुपये पेन्शन

English Summary: Govts Big Decision E-Peak Inspection farmers benefit
Published on: 19 July 2022, 03:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)