Government Schemes

शेतकरी शेतीमधून आणि पशुपालन (animal husbandry) यांमधून अधिक उत्पन्न घेत असतो. मात्र आता मत्स्यपालनातून देखील शेतकरी (farmers) चांगले उत्पन्न घेवू शकतो.

Updated on 20 July, 2022 12:49 PM IST

शेतकरी शेतीमधून आणि पशुपालन (animal husbandry) यांमधून अधिक उत्पन्न घेत असतो. मात्र आता मत्स्यपालनातून देखील शेतकरी (farmers) चांगले उत्पन्न घेवू शकतो. मत्स्यपालन (Fisheries) या व्यवसायातून कमी खर्चात अधिक नफा मिळवू शकतात.

शेतकऱ्यांचा मत्स्यपालनकडे कल राहावा यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (Pradhan Mantri Matsya Sampada Yojana) ही देखील अशीच एक योजना आहे. या योजनेंतर्गत मत्स्यपालन (Fisheries) व्यवसायात इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे.

दिली जाते इतकी सबसिडी

पीएम मत्स्य संपदा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Matsya Sampada Yojana), अनुसूचित जातीतील शेतकरी (Scheduled caste farmers) आणि महिलांना मत्स्यपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी 60 टक्के अनुदान मिळते. इतर शेतकऱ्यांना 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.

'या' योजनेचा लाभ घेताना चुकीची माहिती देऊ नका; अन्यथा बसेल मोठा फटका

असा अर्ज करा

मत्स्यपालनातून (Fisheries) चांगला नफा मिळविण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षणही (free training) दिले जाते. याशिवाय शेतकऱ्यांना (farmers) व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकांकडून स्वस्त दरात कर्जही उपलब्ध करून दिले जाते, जर तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही मत्स्यव्यवसाय (Fisheries) विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकता.

शेतकऱ्याला मत्स्यपालनासाठी (Fisheries) 20 हजार किलो क्षमतेची टाकी किंवा तलाव बनवायचा असेल तर 20 लाख रुपये खर्च होतात. अल्प व अत्यल्प प्रवर्गातील शेतकर्‍यांना ही रक्कम खर्च करणे सोपे नाही. अशा परिस्थितीत या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नाबार्ड (NABARD) पुढे येत आहे. नाबार्ड शेतकऱ्यांना टाक्या किंवा तलाव बनवण्यासाठी एकूण रकमेच्या 60 टक्के अनुदान म्हणून देते.

शेतीतून लाखों रुपये कमवायचे आहेत? तर 'या' जोडव्यवसायातून लाखोंमध्ये घ्या कमाई

बंपर नफा मिळवू शकता

20 लाख खर्चून टाकी किंवा तलाव बांधल्यानंतर तुम्ही मत्स्यपालन सुरू करू शकता. बियाणे आणि माशांची काळजी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले तरी तुम्हाला 5 ते 6 पट जास्त नफा मिळेल. सुरुवातीला शेतकरी 5 ते 6 लाख रुपयांचा नफा सहज कमवू शकतो. एकदा तुम्हाला मत्स्यपालनाचा अनुभव आला की, तुम्ही अशा माशांनाही फॉलो करू शकता, ज्यांना बाजारात मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला या व्यवसायात पुढे जाऊन 15 ते 20 लाखांचा नफा सहज मिळू शकतो.

लष्करी भागात तब्बल 50 हजार झाडे लावणार ; आयुक्त राजेश टोपे यांची मंजूरी

English Summary: Government provides 60% subsidy fish farming
Published on: 20 July 2022, 12:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)