भारतीय अर्थव्यवस्थेत अनन्यसाधारण महत्व असणारं क्षेत्र म्हणजे शेती. आज नाही म्हटलं तरी जवळजवळ ६० ते ७०% लोक ही शेती आणि शेतीच्या निगडित व्यवसायांशी संबंधित असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरवण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. शेतीकामात त्यांना आर्थिक हातभार मिळावा या हेतूने सरकार वेगवेगळ्या योजना आखत असते.
शेती कामात यंत्रांचा वापर वाढल्याने शेतकऱ्यांना शेतीकामे जलदगतीने करणे सहजसोपे झाले आहे. ट्रॅक्टर सारखी कितीतरी यंत्रे शेतकऱ्यांच्या कामी येतात. यंत्राचे महत्व समजून घेऊन आता केंद्र सरकारने देखील याबाबत दखल घेतली आहे. ट्रॅक्टर खरेदीवर केंद्र सरकार शेतकऱ्यांना अनुदान देणार आहे. 'पीएम किसान ट्रॅक्टर योजने' अंतर्गत शेतकऱ्यांना याचा लाभ घेण्यात येणार आहे.
ट्रॅक्टर शेतीकामासाठी अत्यंत महत्वाचे यंत्र आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ट्रॅक्टर सारखे वाहन खरेदी करू शकत नाही. त्यांना एक तर ट्रॅक्टर भाड्याने घेणे अन्यथा पारंपरिक पद्धतीचा म्हणजेच बैलांचा वापर करावा लागतो. अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर देण्यात येणार आहे.
ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार अनुदान देत असते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर हे अर्ध्या किमतीत खरेदी करता येणार आहे. शिवाय अनुदान म्हणून उर्वरित निम्मी रक्कम ही सरकार देते. याव्यतिरिक्त राज्य सरकारही शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50 टक्के सबसिडी देत असते.
मोठी बातमी! राज्यातील पुढील ऊस गळीत हंगाम सुरू होणार 1 ऑक्टोबरपासून- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
कसा घ्याल लाभ
केवळ 1 ट्रॅक्टर खरेदीवरच सरकार अनुदान देते. या योजनेचा तुम्हाला लाभ घेयचा असेल तर त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे लागतात. शेतकऱ्याकडे आधार कार्ड, जमिनीचे कागद, बँक डिटेल्स, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. शेतकरी बंधू कोणत्याही CSC केंद्राला भेट देऊन ऑनलाइन अर्ज देखील करू शकतात.
महतवाच्या बातम्या:
शेतकऱ्यांना फसवणे पडले महागात; पोलिसांनी जप्त केला लाखोंचा मुद्देमाल
आता मिळणार 'डिजिटल रेशन कार्ड'; 'या' राज्याने घेतला महत्वपूर्ण निर्णय
Published on: 17 June 2022, 11:22 IST