Government Schemes

शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत हा सरकारचा हेतू आहे. शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात आहे. यामुळे त्यांना आधार देणे गरजेचे आहे. असे असताना आता सरकारने एक योजना सुरु केली आहे. सरकार जमीन खरेदीसाठी देखील आता शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देत आहे.

Updated on 15 October, 2022 10:24 AM IST

शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरवण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना चार पैसे मिळावेत हा सरकारचा हेतू आहे. शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात आहे. यामुळे त्यांना आधार देणे गरजेचे आहे. असे असताना आता सरकारने एक योजना सुरु केली आहे. सरकार जमीन खरेदीसाठी देखील आता शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान देत आहे.

यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. शेती (Agriculture) करताना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सरकार मदत करतच. असे असताना मात्र अनेक योजना या शेतकऱ्यांना माहिती नसतात. आता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौध्द शेतमजूरांना शेतजमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान मिळते.

अनुसूचित जाती घटकांमधील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी (Land Purchase Subsidy) राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत शासनाने आमुलाग्र बदल केला आहे. आता ही योजना 100 टक्के अनुदानाची करण्यात आली आहे. यामुळे ही एक फायदेशीर योजना आहे.

Farmer Income: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असल्याचे माझ्याकडे पुरावे, केंद्रीय कृषिमंत्र्यांचा दावा

यामुळे या मजुरांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. तसेच त्यांचे राहणीमान (Lifestyle) देखील सुधारेल. विधवा व परित्यक्ता महिलांना या योजनेसाठी स्वतंत्र घटक मानण्यात आला आहे. त्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने दिला जाईल. या योजनेमध्ये 100 टक्के अनुदानावर 4 एकर कोरडवाहू जमीन आणि 2 एकर बागायती जमीन लाभार्थ्यांस उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

आता निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा मिळणार मदत, राज्य सरकारचा मोठा निर्णय

दरम्यान, केंद्र सरकार आणि राज्य सरकार सामान्यांसोबतच शेतकऱ्यांसाठी देखील विविध योजना राबवत असते. या योजनांचा लाभ घेऊन सामन्यांना जशी त्यांची जीवनशैली (Lifestyle) सुधारण्यास फायदा होतो. या योजनेचा देखील हाच उद्देश आहे. यामुळे ही एक फायदेशीर योजना ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या;
पावसात जनावरे दगावली तर मिळणार मदत, शेती पाण्याखाली शेती गेली की मिळणार तत्काळ मदत..
आपत्ती मदत रकमेत ५० टक्क्यांनी वाढ, आता पूर-पाऊस आणि पिकांचे नुकसान झाल्यास अधिक भरपाई दिली जाणार
दिवाळीच्या तोंडावर शिंदे सरकार देणार वीज दरवाढीचा शॉक, वीज दरवाढ होणार

English Summary: government give 100 percent subsidy land purchase
Published on: 15 October 2022, 10:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)