केंद्र सरकार आणि राज्यसरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ (incentive subsidy) घेता येतो. यामधीलच एक महत्वाची योजना म्हणजे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019, या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
या योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers) राज्य सरकारकडून 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. नियमात बसणाऱ्या नियमित कर्जदारांना 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत अनुदानाची रक्कम मिळणार आहे. या शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.
वाटाणा, शेवग्याचे भाव तेजीत; जाणून घ्या बाजार समितीतील बाजारभाव
महत्वाचे म्हणजे लाभार्थी शेतकर्यांची यादी कर्जमाफीच्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. प्रसिद्ध झालेल्या यादीतील शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरण 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे, त्यानंतर आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकर्यांच्या बचत खात्यावर लाभाची रक्कम वर्ग होणार आहे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे.
आता अपात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळणार; 9 जिल्ह्यांसाठी तब्बल 755 कोटींचा निधी मंजूर
सांगली जिल्ह्याची एकूण 1 लाख 60 हजार 795 खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. त्यापैकी पहिल्या यादीमध्ये 62 हजार 642 लाभार्थ्यांची नावे समाविष्ट आहेत. उर्वरीत पात्र लाभाथ्यांच्या याद्या यापुढे शासनाकडून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
यादीत नाव असलेल्या शेतकर्यांनी योजना संपण्यापूर्वी विनाविलंब आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करुन घ्यावे. आधार प्रमाणीकरण न केल्यास प्रोत्साहनपर अनुदान लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार नाही, असे मंगेश सुरवसे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
कमी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खुशखबर; पोस्ट ऑफिसच्या तीन नव्या योजना लॉन्च, मिळतोय मोठा परतावा
शेतकऱ्यांनो जवस लागवडीसाठी 'या' सुधारित जातीचा वापर करा; होणार फायदाच फायदा
रब्बी हंगामासाठी ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी
Published on: 14 October 2022, 01:59 IST