कमी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसच्या योजना (post office schemes) फायदेशीर ठरतात. अशा अनेक योजना आहेत, ज्यामधून सर्वसामान्य लोकांना चांगला परतावा मिळतो. त्यामुळे अनेक छोटे गुंतवणूकदार बचतगट किंवा फंड अशा ठिकाणी पैसे गुंतवत असतात.
आता या छोट्या गुंतवणूकदारांचा विचार करत पोस्टाने तीन नवीन स्कीम आणल्या आहेत. या तिन्ही स्कीममध्ये सर्वसामान्य लोकांना गुंतवणूक करून सहजपणे अधिक नफा कमवता येईल.सुरक्षित गुंतवणूक राहत असल्याने भारतातील प्रत्येक नागरिक पोस्टऑफिसवर विश्वास ठेवतो. कारण पोस्ट ऑफिस शासन नियमांनुसार चालते. गुंतवणूकदारांना कसलीच अडचण येत नाही.
सिंह, कन्यासह या राशीच्या व्यक्तींनी सावध राहण्याची गरज; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
1) पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना
सर्वसामान्य लोकांसाठी ही योजना उत्तम ठरू शकते. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना (Post Office Recurring Deposit Scheme) ही अतीशय कमी गुंतवणूकीपासून सुरु होते. यात तुम्ही महिन्याला फक्त १०० रुपये भरू शकतात. या योजनेची मॅच्यूरिटी फक्त ५ वर्षांची आहे.
तुम्ही गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर ही योजना तुम्हाला ५.८ टक्के व्याज देखील देते. तसेच जास्त गुंतवणूक करायची असल्यास त्यावर देखील कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ तुम्ही विश्वासाने घेऊ शकता.
2) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेत गुंतवणूकीसाठी १ हजार रुपयांपासून तुम्ही सुरुवात करू शकता. यात ५ वर्षांची मॅच्यूरिटी देण्यात आली आहे. तसेच लॉक इन कालावधी देखील ५ वर्षांचा आहे. तुमच्या जमा झालेल्या रकमेवर तुम्हाला ६.८ टक्के रिटर्न निळते. ही योजना देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
वाटाणा, शेवग्याचे भाव तेजीत; जाणून घ्या बाजार समितीतील बाजारभाव
3) पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट
ही योजना बॅंकेतील फिक्स डिपॉझिट प्रमाणे आहे. यात १ वार्षापासून ते ५ वर्षांपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. १ ते ३ वर्षांच्या मुदत ठेवीवर तुम्हाला ५.५ टक्के कॅश बॅक आहे. तसेच व्याज ६.७ टक्के देण्यात आले आहे. यातील गुंतवणुकीवर आयकर सुट देखील आहे. त्यामुळे मोठी गुंतवणूक करणा-यांसाठी देखील ही योजना फायदेशीर राहिल. या योजनेत देखील तुम्ही 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकता.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो जवस लागवडीसाठी 'या' सुधारित जातीचा वापर करा; होणार फायदाच फायदा
रब्बी हंगामासाठी ४५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी
आता अपात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळणार; 9 जिल्ह्यांसाठी तब्बल 755 कोटींचा निधी मंजूर
Published on: 14 October 2022, 01:17 IST