Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. यामधीलच एक योजना म्हणजे सौर पंप योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.

Updated on 29 October, 2022 10:37 AM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. यामधीलच एक योजना म्हणजे सौर पंप (solar pump) योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.

शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार 30-30 टक्के अनुदान देत असते. बाकीचे 30 टक्के अनुदान शेतकरी बँकेद्वारे कर्ज घेऊ शकतात.

देशातील बहुतांश भागात पाण्याच्या कमतरतेमुळे जमिनीतील ओलावा कमी होत आहे. शेतं सुकत चालली आहेत. त्यामुळे पिकांचे उत्पादन (crop production) घटत आहे. त्याचबरोबर डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वच शेतकऱ्यांना सिंचनाच्या पुरेशा सुविधांचा वापर करणे शक्य होत नाही.

अशा स्थितीत केंद्र व राज्य सरकारकडून सिंचनाच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये पीएम कुसुम योजना देखील आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना अनुदान देऊन सौरपंप बसविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

सरकारची खास योजना! 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर पाच वर्षांत मिळणार 2 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी

अर्ज असा करा

प्रधानमंत्री कुसुम (kusum) योजनेसाठी राज्यांच्या विविध अधिकृत वेबसाइट्स जाहीर करण्यात आल्या आहेत. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही https://mnre.gov.in/ ला भेट देऊ शकता.

शेतकऱ्यांसाठी सागवानची शेती ठरेल फायदेशीर; काही वर्षातच शेतकरी होतील करोडपती

या कागदपत्रांची आवश्यकता

कुसुम योजनेंतर्गत सौरपंप बसविण्यासाठी शेतकऱ्यांना काही कागदपत्रे सादर करावी लागतात. शेतकर्‍यांना त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, आधारशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक, बँकेच्या पासबुकची प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीशी संबंधित कागदपत्रांची आवश्यकता असेल.

महत्वाच्या बातम्या 
कापसाला 12 हजार रुपयांचा हमीभाव द्या; शेतकऱ्यांची मागणी
'या' राशीच्या लोकांच्या मनातल्या इच्छा होणार पूर्ण; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी! फक्त 35 हजारांची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; वाचा वैशिष्ट्ये...

English Summary: Good news Farmers 90% subsidy purchase solar pump
Published on: 29 October 2022, 10:36 IST