सरकार शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी आर्थिक मदत जाहीर करीत असते. यामधून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो. आता सरकारने गोगलगायींच्या (Snail) प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यांत सोयाबीन पिकावर शंखी गोगलगायींच्या (Snail) प्रादुर्भावामुळे नुकसान (Crop Damage) झालेल्या शेतकऱ्यांना ९८ कोटी ५८ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे, असे जाहीर केले आहे.
सरकारने तीन जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांसाठी (farmers) मदत देण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक ९२ कोटी ९९ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. यावर्षी अतिवृष्टी आणि गोगलगायीचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीनला तडाखा बसला आहे.
बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत याचा प्रादुर्भाव (Outbreak) मोठ्या प्रमाणात होता. सरकारी यंत्रणेने पंचनामे केल्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषात बसत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे.
सरकारने (government) नुकत्याच केलेल्या वाढीनुसार १३ हजार ३०० रुपयेप्रमाणे प्रति दोन आणि तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत केली जाणार आहे.
गुंठा, एकर, हेक्टरमध्ये शेत जमिनीची मोजणी कशाप्रकारे करतात? जाणून घ्या
इतकी मिळणार मदत
1) लातूर जिल्हा
राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीमध्ये लातूर जिल्ह्याला सर्वाधिक मदत मिळणार आहे. यामध्ये दोन हेक्टरपर्यंत बाधित ९२ हजार ६५२ शेतकऱ्यांच्या, ५९ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रासाठी ८१ कोटी २७ लाख ८४ हजार रुपये एवढी मदत देण्यात येणार आहे.
2) बीड
बीडमधील १२ हजार ९५९ शेतकरी या निकषात बसत असून, ३८२२. ३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी ५ कोटी १९ लाख ८४ हजार रुपये
3) उस्मानाबाद
उस्मानाबादमधील ४०१ शेतकऱ्यांना २८३. ८३ हेक्टर क्षेत्रासाठी ३८ लाख सहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
4) लातूर
लातूरमधील तीन हेक्टरच्या मर्यादेच्या निकषातील १२ हजार ९८४ शेतकऱ्यांच्या ८६२०.७० हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ११ कोटी ७२ लाख ४२ हजार रुपये मदत दिली जाणार आहे.
मसाले, औषधे आणि चहामध्ये वापरल्या जाणार्या 'या' पिकाची लागवड करा आणि व्हा करोडपती
अशी मिळणार मदत
बाधित शेतकरी - क्षेत्र - मदत (लाखांत)
बीड - १२९५९ शेतकरी, ३८२२ क्षेत्र, ५१९. ८४ मदत
लातूर - ९२६५२ शेतकरी, ५९७६४ क्षेत्र, ८१२७.९४ मदत
उस्मानाबाद - ४०१ शेतकरी, २८.३ क्षेत्र, ३८.६ मदत
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो 'या' योजनेतून दरमहा मिळवा 3 हजार रुपये; सरकार देतंय पेन्शन
LIC ची नवीन योजना लाँच; फक्त 5 हजार रुपयांमध्ये जबरदस्त फायदे आणि बोनसही
आजचा संपूर्ण दिवस ठरणार फायद्याचा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Published on: 15 September 2022, 11:15 IST