Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. आपण आज अशाच एका योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Updated on 13 September, 2022 4:36 PM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना (scheme) राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. आपण आज अशाच एका योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

सरकार शेतकऱ्यांना शेळीपालन व्यवसायासाठी (Goat rearing business) अनुदान देत आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला अनुदान हवे असल्यास तुम्ही बँकेत अर्ज करून अनुदानाचा (subsidy) लाभ घेऊ शकता. त्यानंतर बँक 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान देईल.

लहान शेतकरी कमी खर्चात असलेल्या शेळीपालनाला (goat rearing) महत्त्व देतात, कारण शेळ्यांची फार काळजी घ्यावी लागत नाही आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही आरामात केली जाते. शेळीपालन करण्याची इच्छा असलेले अनेक शेतकऱ्यांना नाबार्ड भरघोस अनुदान देत असते.

जीवन पॉलिसीमध्ये जमा करा महिना फक्त 794 रुपये आणि मिळवा 5 लाखांचा नफा

या बँकांमध्ये अर्ज करा

काही बँका शेळ्यांसारख्या लहान जनावरांसाठी कर्ज देतात. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयडीबीआय बँक (IDBI Bank), कॅनरा बँक इत्यादींचा समावेश आहे. या बँकांशिवाय नाबार्डकडून शेतकऱ्यांना कर्ज आणि अनुदानाची सुविधाही दिली जात आहे.

आनंदाची बातमी! पोस्ट ऑफिसच्या योजनेत घरी बसून करा गुंतवणूक, मिळणार 'इतका' लाभ

नाबार्डकडून सबसिडी

1) नाबार्डने (NABARD) शेतकरी आणि पशुपालकांच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत.
2) त्याचप्रमाणे, शेळीपालन व्यवसायासाठी, ही संस्था आपल्या शेतकरी ग्राहकांना जास्तीत जास्त 2.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान सुविधा प्रदान करते.
3) यामध्ये अनुसूचित जाती/जमातीसह दारिद्रयरेषेखालील प्रवर्गातील शेतकरी (farmers) व पशुपालकांना 33 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे.
4) त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गातील शेतकरी आणि पशुपालकांना जास्तीत जास्त 25 टक्के अनुदान दिले जात आहे.

महत्वाच्या बातम्या 
शेतकरी मित्रांनो 'या' फुलाची लागवड करून ३० वर्षांपर्यंत घ्या कमाई; मिळेल चांगला नफा
मिरचीच्या दरात घट तर टोमॅटोच्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ; जाणून घ्या आजचे बाजारभाव
मासिक पाळी अनियमित येण्याची 'ही' आहेत कारणे; जाणून घ्या सविस्तर

English Summary: Good news 3 lakh subsidy farmers goat rearing
Published on: 05 September 2022, 06:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)