Government Schemes

देशातील नागरिक पैशांची बचत करण्यासाठी वेगवेगळ्या योजनेमध्ये गुंतवणूक करत असतात. तुम्ही देखील जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. मित्रांनो तुम्ही जर सुरक्षित गुंतवणूक करू इच्छित असाल तर भारतीय पोस्ट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो.

Updated on 15 May, 2022 10:21 PM IST

देशातील नागरिक पैशांची बचत करण्यासाठी वेगवेगळ्या योजनेमध्ये गुंतवणूक करत असतात. तुम्ही देखील जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. मित्रांनो तुम्ही जर सुरक्षित गुंतवणूक करू इच्छित असाल तर भारतीय पोस्ट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो.

पोस्ट ऑफिसद्वारे अनेक प्रकारच्या गुंतवणुकीच्या योजना संपूर्ण देशात चालवल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक करून तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता तसेच पोस्ट ऑफिस कडून चांगला परतावा देखिल मिळवू शकता. 

विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस ही एक सरकारी संस्था असल्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणे जोखीम विरहित आहे. पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक गुंतवणुकीच्या योजना आहेत ज्यामध्ये तुमची रक्कम थेट दुप्पट केली जाऊ शकते. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस च्या या सर्व योजनांमध्ये तुम्हाला व्याजाचा लाभही मिळतो.

आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दरमहा अगदी नोकरदाराप्रमाणे कमाई करू शकणार आहात. मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही दरवर्षी 29700 रुपये कमवू शकता. पोस्ट ऑफिस मंथली इनकम अस या योजनेचे नाव आहे.

एकदाच गुंतवणूक आणि कायम परतावा 

पोस्ट ऑफिसच्या या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे तुम्हाला या योजनेत एकरकमी रक्कम जमा करावी लागेल म्हणजेच तुम्हाला MIS खात्यात एकदाच गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर तुम्ही दरमहा चांगली कमाई करू शकता. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की, पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही योजनेवर बाजारातील चढउतारांचा कोणताही परिणाम होत नाही. पोस्ट ऑफिसच्या सर्व योजना या सुरक्षित परतावा देणाऱ्या असतात. यामुळे निश्चितच गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिस एक उत्तम पर्याय आहे.

जाणून घ्या काय आहे योजनेची खासियत-

मित्रांनो जर आपणास या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला 1000 च्या पटीत पैसे गुंतवावे लागतील.

याशिवाय तुम्ही एका खात्याद्वारे जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये एवढी रक्कम गुंतवू शकता.

मात्र जर तुम्ही या योजनेअंतर्गत संयुक्त खाते उघडले तर तुम्ही जास्तीत जास्त 9 लाखांची गुंतवणूक करू शकता.

पोस्ट ऑफिस च्या या योजनेची मॅच्युरिटी अर्थात परिपक्वता 5 वर्षांची आहे.

मित्रांनो सध्या पोस्ट ऑफिसच्या या सरकारी योजनेत 6.6% वार्षिक व्याज दिले जात आहे.

29700 कसे मिळतील?

मित्रांनो जर तुम्ही यामध्ये 4.5 लाख रुपये एवढी रक्कम गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या योजनेतून वार्षिक 29 हजार 700 रुपये पाच वर्षासाठी मिळवू शकता. म्हणजे जर तुम्ही साडे चार लाख रुपये एकरकमी जमा केले, तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला पुढील 5 वर्षांसाठी 29,700 रुपये वार्षिक उत्पन्न मिळेल. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2475 रुपये मिळतील.

मुदतपूर्व मुदतीत पैसे कापले जातील

या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षे आहे आणि तुम्ही डिपॉझिट केल्यानंतर एक वर्ष पैसे काढू शकत नाही. यामध्ये जर तुम्ही एक ते 3 वर्षांच्या दरम्यान पैसे काढले तर ठेव रकमेतून 2 टक्के वजा केल्यावर तुम्हाला पैसे मिळतील. त्याच वेळी, जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी 3 वर्षांनी पैसे काढले तर त्यातून 1% रक्कम वजा केली जाईल. याशिवाय 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती 5 वर्षांसाठी वाढवता येऊ शकते.

योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते

या योजनेत जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार कार्ड किंवा वाहन चालविण्याचा परवाना द्यावा लागेल. यासोबतच तुम्हाला 2 पासपोर्ट आकाराचे फोटोही द्यावे लागतील. याशिवाय, सरकारने जारी केलेले ओळखपत्र किंवा युटिलिटी बिल पत्त्याच्या पुराव्यासाठी वैध असेल. 

English Summary: Good news! 29,700 from this post office scheme; Read about it
Published on: 15 May 2022, 10:21 IST