Government Schemes

आपण केलेली बचत आणि त्या बचतीची केलेली गुंतवणूक यावर आपले सगळे भविष्य अवलंबून असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पैसे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचा विमा काढून स्वतःचे भविष्य सुरक्षित करतात.

Updated on 18 July, 2022 3:09 PM IST

 आपण केलेली बचत आणि त्या बचतीची केलेली गुंतवणूक यावर आपले सगळे भविष्य अवलंबून असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पैसे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचा विमा काढून स्वतःचे भविष्य सुरक्षित करतात.

परंतु जर आपण विमा काढल्यानंतर भरायच्या प्रीमियम चा विचार केला तर बऱ्याच महागड्या स्वरूपात ते असतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना विमा पॉलिसी घेणे दुरापास्त होते.

अशा सर्वसामान्य लोकांसाठी भारतीय पोस्ट विभागाने एक आकर्षक विमा योजना आणली असून या योजनेत वर्षाला फक्त 299 आणि 399 रुपयांचा हप्ता भरायचा आहे. यामधून दहा लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.

नक्की वाचा:Post Office Scheme: पोस्टात 299 रुपये जमा करा, 10 लाख मिळणार; कसं ते वाचाचं

 या विम्याचे नेमके स्वरूप

 299 रुपयांच्या विमा मध्ये अपघाती मृत्यू,कायमचे अपंगत्व किंवा कायमचे अंशिक अपंगत्व यासाठी दहा लाख रुपयांचे संरक्षण या द्वारे प्रदान करण्यात येते. तसेच 299 रुपयांच्या या विम्यामध्ये अपघात उपचारासाठी साठ हजार रुपयांपर्यंतचा आयपीडी खर्च आणि ओपीडी क्लेम मध्ये तीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च उपलब्ध होणार आहे.

तसेच दहा दिवस रुग्णालयात दररोज एक हजार रुपये, कुटुंबाचा वाहतूक खर्च 25 हजार रुपयांपर्यंत तसेच अंत्यविधीचा खर्च पाच हजार रुपयांपर्यंत या योजनेत मिळणार आहे. याशिवाय मुलांच्या शिक्षणासाठी खर्च म्हणून प्रत्येक मुलासाठी एक लाख रुपयांपर्यंतची मदत देण्यात येणार आहे.

नक्की वाचा:पीएफखात्यातून आता दुप्पट पैसे काढता येणार, फक्तहेकाम करा!

 योजनेची मुदत

विमा योजना 30 जून पासून पोस्ट  विभागाने सुरू केली असून 15 ऑगस्ट पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

 या योजनेचा फायदा कोणाला मिळू शकतो?

इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि टाटा एआयजी यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार18 ते 65 वर्षे वयाच्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

 या योजनेमध्ये काय कव्हर होईल?

 सर्व प्रकारचे अपघात, गाडीवरुन पडून अपघात, कायमचे किंवा अंशिक पूर्ण अपंगत्व, विजेचा शॉक, सर्पदंश आणि अर्धांगवायू झाल्यास दहा लाख रुपयांचे संरक्षण मिळेल.

नक्की वाचा:करा 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक आणि मिळवा दरमहा दीड लाख रुपये पेन्शन, वाचा सविस्तर तपशील

English Summary: get ten lakh insurance cover in only annual 299 rupees premium
Published on: 18 July 2022, 03:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)