केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आणि त्या योजनांच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान स्वरूपात मदत ही कृषी क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचे ठरत आहे. कारण कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या बऱ्याच प्रकारचे कार्य अशा अनुदानामुळे किंवा सरकारच्या योजनांच्या साह्याने शेतकरी बंधूंना पूर्ण करण्यात सुलभता येत आहे. जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर यामध्ये कृषी यांत्रिकीकरणापासून ते अनेक प्रकारचे फळबाग लागवड असो किंवा इतर अनेक प्रकारच्या योजना यासंबंधी राबवल्या जातात.
तसेच पशुसंवर्धनामध्ये देखील पशुपालकांसाठी विविध प्रकारच्या योजना आहेत. जेणेकरून अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती व्यवसाय आणि इतर व्यवसाय करणे सोपे जावे हा त्यामागचा उद्देश असतो. अशीच एक योजना राज्यामध्ये बायोगॅस प्लांट उभारण्यासाठी देखील जिल्हा परिषदांच्या माध्यमातून अनुदानाची तरतूद करण्यात आली असून
या माध्यमातून बायोगॅस प्लांट च्या आकारमानानुसार कमाल 70 हजार रुपये पर्यंतच्या अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. अगदी याच धर्तीवर आता गोकुळ दूध संघाने देखील सभासद असलेल्या महिला दूध उत्पादकांना बायोगॅस प्लांट उभारणीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा:मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांच्या कारखान्यांना बिनव्याजी मदत
काय आहे नेमका हा निर्णय?
जर आपण या निर्णयाचा विचार केला तर यामध्ये ही योजना जिल्हा दूध संघ व सिस्टीमा कंपनी आणि एनडीडीबी( मृदा) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जाणार असून या माध्यमातून आता गोकुळच्या दूध उत्पादक महिलांना बायोगॅस संयंत्र बसवण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक मदत केली जाणार आहे.
योजनेच्या माध्यमातून तब्बल 5000 बायोगॅस प्लांटची उभारणी कार्बन क्रेडिट योजनेअंतर्गत केली जाणार आहे. ही जी काही योजना राबवली जाणार आहे हिचा कालावधी हा डिसेंबर 2023 असणार असून यामध्ये जास्तीत जास्त गोकुळ दूध संघाच्या महिला दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा असे आव्हान देखील चेअरमन विश्वास पाटील यांनी केले आहे.
या बायोगॅस प्लांट च्या माध्यमातून स्लरीच्या स्वरूपात खत देखील उपलब्ध होणार आहे व पशुपालकांना इंधन देखील मिळणार आहे. गोकुळच्या कार्बन क्रेडिट योजनेच्या माध्यमातून दोन घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस प्लांट उभारण्यासाठी गृहीत खर्च हा 41260 रुपये धरण्यात आला असून प्रति लाभार्थी महिलेला पस्तीस हजार 270 रुपयाच्या अनुदान या माध्यमातून दिले जाणार आहे. म्हणजेच एकूण पाच हजार 990 रुपये महिला दूध उत्पादकांना हा बायोगॅस प्लांटचा खर्च करावा लागणार आहे.
या योजनेचा लाभ जवळजवळ 5000 लाभार्थ्यांना मिळणार असून 17 कोटी पेक्षा जास्त रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना या माध्यमातून होणार आहे. जर आपण या दोन घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस प्लांट चा विचार केला तर यामुळे सहा माणसांचे एक कुटुंब प्रति महिना गॅसच्या एका सिलेंडरची बचत होणार असल्याचा देखील दावा करण्यात आला आहे.
त्यामुळे नक्कीच महिला दूध उत्पादकांना याचा फायदा होणार आहे. यासाठी ज्या महिला दूध उत्पादकांना यामध्ये सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी आपल्या प्राथमिक दूध संस्थेच्या माध्यमातून गोकुळ कडे नाव नोंदवावे लागणार आहे.
नक्की वाचा:110 कारखान्यांनी दिली नाही एकरकमी एफआरपी, सरकारचे लक्ष आहे का?
Published on: 13 December 2022, 04:21 IST