गुंतवणुकीत अनेकदा धोका असतो पण पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे. कारण ही गुंतवणूक सरकारी संस्थेत होत आहे. त्यामुळे तुम्ही चांगला आणि सरकारी गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर ही गुंतवणूक योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
तसेच या योजनेतून मोठा तुम्ही निधी जमा करू शकता. पोस्टातील गुंतवणुकीमध्ये सुरक्षितता आणि चांगला परतावा आहे. पोस्ट ऑफिस लहान बचत योजना हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. ग्राम सुरक्षा योजना ही एक गुंतवणूक योजना आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दरोरोज ५० रुपये म्हणजे महिन्याला १५०० रुपये जमा करावे लागतील.
ही रक्कम तुम्ही नियमितपणे जमा केल्यास तुम्हाला भविष्यात ३१ ते ३५ लाखांचा लाभ मिळू शकतो. १९ ते ५५ कोणताही भारतीय नागरिक या योजनेत भाग घेऊ शकतो. १०००० ते १० लक्ष पर्यंत या योजनेत विमा मिळू शकतो.
ही गुंतवणूक तीन महिने, सहा महिने किंवा वार्षिक असू शकते. प्रीमियम पेमेंटसाठी ३० दिवसांची सूट असून या योजनेवर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. ही योजना घेतल्यानंतर तुम्ही ३ वर्षांनी तुम्ही ही योजना बंदही करू शकता. पण त्याचा फायदा होत नाही.
समजा एखाद्याने वयाच्या १९ व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि १० लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर ५५ वर्षांसाठी मासिक प्रीमियम १५१५ रुपये, ५८ वर्षांसाठी १४६३ रुपये आणि ६० वर्षांसाठी १४११ रुपये असेल. अशात पॉलिसीधारकाला ५५ वर्षांसाठी ३१.६० लाख रुपये, ५८ वर्षांसाठी ३३.४० लाख रुपये आणि ६० वर्षांसाठी ३४.६० लाख रुपये मॅच्योरिटी बेनिफिट मिळेल.
महत्वाच्या बातम्या
Current Mansoon Update: भारतातील 27 मे चे मान्सूनचे आगमन लांबणार का? मान्सूनचा श्रीलंकेच्या वेशीवर खोळंबा
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! संपूर्ण देशात दोनच आठवड्यात टोमॅटोच्या भावात दुप्पट वाढ, दर शंभरी पार
Published on: 24 May 2022, 12:47 IST