Government Schemes

शेतकरी तसेच पशुपालक आणि इतर शेती संबंधित व्यवसायांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक आधार देऊन संबंधित व्यवसाय यशस्वी व्हावेत व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी केंद्र सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. आपल्याला माहित आहेच कि शेतकरी राजा शेती संबंधित किंवा पशुपालन संबंधित असलेली आर्थिक गरज भागविण्यासाठी बऱ्याचदा सावकारांच्या दाराशी जाऊन अव्वाच्या सव्वा दराने कर्ज घेतात व कायमचे कर्जाच्या विळख्यात अडकतात.

Updated on 03 August, 2022 6:02 PM IST

शेतकरी तसेच पशुपालक आणि इतर शेती संबंधित व्यवसायांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक आधार देऊन संबंधित व्यवसाय यशस्वी व्हावेत व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी केंद्र सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. आपल्याला माहित आहेच कि शेतकरी राजा शेती संबंधित किंवा पशुपालन संबंधित असलेली आर्थिक गरज भागविण्यासाठी बऱ्याचदा सावकारांच्या दाराशी जाऊन अव्वाच्या सव्वा दराने कर्ज घेतात व कायमचे कर्जाच्या विळख्यात अडकतात.

हे असे होऊ नये म्हणून सरकारने विविधप्रकारच्या योजना अमलात आणल्या व त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न देखील सरकार करत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्ड आणले व या माध्यमातून शेतकऱ्यांना तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून दिले.

आपल्याला माहित आहेच की या योजनेअंतर्गत एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्जासाठी जर तुम्ही अर्ज केला तर यासाठी कुठल्याही प्रकारची गॅरंटीची आवश्यकता लागत नाही. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतीच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त आहे, अगदी त्या पद्धतीनेच ही सुविधा आता मत्स्यव्यवसाय करणारे शेतकरी आणि पशुपालकांना देखील देण्यात आली आहे.

नक्की वाचा:Animal Husbandry: पशुपालकांनो सावधान! जनावरांना होतेय विषबाधा; 'या' वनस्पतीपासून ठेवा लांब, जाणून घ्या

याबाबतचे केंद्राचे धोरण

24 सप्टेंबर 2021 रोजी वित्त मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती व त्यामध्ये म्हटले होते की, मच्छीमारांसह सर्व कार्डधारकांना 1.6 लाख रुपयांपर्यंतचे तारण मुक्त कर्ज किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळू शकते. ही सुविधा देण्यात आली होती ती प्राणी, पक्षी, मासे, कोळंबी, जलचर आणि मासेमारी यांचे संगोपन करण्यासाठी अल्प मुदतीच्या कर्जाची आवश्यकता पूर्ण करेल.

अगोदर किसान क्रेडिट कार्डची सुविधा फक्त शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होती आणि त्या माध्यमातून मिळणारे कर्ज हे कारण मुक्त होतेच परंतु त्याची मर्यादा फक्त एक लाख रुपये होती. आता ही मर्यादा वाढवून शेतकऱ्यांसाठी 1.60 लाख करण्यात आली व पशुपालक आणि मच्छीमारांसाठी ही या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.

नक्की वाचा:PM Kisan: शेतकऱ्यांचे अच्छे दिन! 12व्या हप्त्यात 2000 ऐवजी मिळणार 4000 रुपये; जाणून घ्या कसे

केसीसी वर किती व्याज आकारले जाते?

 किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या माध्यमातून तीन लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जाचा व्याजदर सामान्यता नऊ टक्के असतो.

मात्र यामध्ये केंद्र सरकार दोन टक्के सूट देते. परंतु तुम्ही जर कर्जाचे पैसे वेळेवर परत केले तर तुम्हाला परत तीन टक्के सूट मिळते. म्हणजे यामध्ये एकूण सूट पाच टक्के मिळते व तुम्हाला फक्त 4 टक्के व्याज भरावे लागते.

याचा अर्थ असा होतो की हे सर्वात स्वस्त दरात मिळणारे कर्ज आहे. त्यामुळे शेतकरी बांधव तसेच पशुपालन आणि मत्स्य पालन करणारे शेतकऱ्यांनी सावकारांकडून पैसे घेण्यापेक्षा किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेऊन आपला व्यवसाय वृद्धिंगत करावा.

नक्की वाचा:आता शेतकऱ्यांना पंप संच घेण्यासाठी मिळणार २० हजार रुपये, असा घ्या लाभ..

English Summary: get 1.60 lakh rupees loan by kcc to fishary and animal husbundry
Published on: 03 August 2022, 06:02 IST