Government Schemes

सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखत असते. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकार प्रयत्न करत असते. आता सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी 'किसान क्रेडिट कार्ड' अर्थात 'केसीसी' योजना राबवली जात असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे,खते, कीटकनाशक, तसेच शेतीकामांसाठी कर्ज दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

Updated on 09 July, 2022 7:29 PM IST

सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखत असते. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकार प्रयत्न करत असते. आता सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी 'किसान क्रेडिट कार्ड' अर्थात 'केसीसी' योजना राबवली जात असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे,खते, कीटकनाशक, तसेच शेतीकामांसाठी कर्ज दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

यामध्ये स्वत:च्या मालकीची जमीन असणारे आणि इतरांची जमीन भाडेतत्वावर करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येतो. ही योजना सुरु होऊन अनेक दिवस झाले आहेत, अनेक शेतकऱ्यांनी याचा फायदा देखील केला आहे. आता सरकारने या योजनेचा लाभ घेणारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड धारकांना कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या आहेत.

याबाबत एक बैठक पार पडली. यामध्ये मासेमारी करणारे व दुग्धव्यवसाय क्षेत्रातील नागरिकांनाही 'किसान क्रेडिट कार्ड' योजनेचा लाभ देण्यावर चर्चा झाली. शेतकऱ्यांना कृषी कर्जाचे वाटप करण्यात प्रादेशिक ग्रामीण बँकांची भूमिका महत्त्वाची असते. दुसर्‍या सत्रात, प्रायोजक बँकांचे डिजिटायझेशन व तंत्रज्ञान सुधारण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती भागवत कराड यांनी दिली.

बकरी ईद निमित्त ताजमहलमध्ये जाणारांसाठी आनंदाची बातमी, प्रशासनाचा निर्णय..

सध्या देशातील अनेक बॅंका तोट्यात आहेत. या बॅंकांना 9 टक्के नियामक भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्याचे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. त्यामुळे खरिप हंगामाच्या तोंडावर या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीच्या कामांना यामुळे वेग येणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो काळजी घ्या, आता बनावट कीटकनाशके बाजारात, अशी करा खात्री...
आता 25 वर्ष येणार नाही वीज बिल, मोदी सरकारची मोठी घोषणा..
भाजप अजून एक डाव टाकनार, 'हा' माजी शिवसैनिक होणार उपराष्ट्रपती?

English Summary: Finance Minister's big announcement for farmers! Great relief to the farmers ..
Published on: 09 July 2022, 07:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)