Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. यामधीलच एक महत्वाची योजना म्हणजे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. या अनुदानाचे तीन टप्यात वाटप करण्यात येणार आहे.

Updated on 16 October, 2022 2:56 PM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना (new scheme) राबवत असते. यामधीलच एक महत्वाची योजना म्हणजे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. या अनुदानाचे तीन टप्यात वाटप करण्यात येणार आहे.

नियमितपणे आपल्या पीक कर्जाची (crops loan) परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने खुसखबर दिली आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांना महागाईचा फटका; ज्वारी, बाजरी, तांदळाच्या दरात वाढ

तीन टप्प्यांत मिळणार अनुदान

शेतकऱ्यांना या प्रोत्साहन अनुदानाची रक्कम तीन टप्प्यांत मिळणार आहे. या अनुदानासाठी (Lifestyle) पात्र झालेल्या 8 लाख 29 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या याद्या ऑफलाईन पाहण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल. तसेच ऑनलाईन (online) पाहण्यासाठी तुम्हाला सिएससी पोर्टलवर जावे लागेल.

ज्यावर तुम्ही तुमच्या याद्या पाहू शकता. तसेच सदर अनुदानासाठी मिळालेली रक्कम बँकांनी कर्जापोटी वर्ग करून घेऊ नये, या खातर शेतकऱ्यांच्या बचत खात्यात ही रक्कम वितरित केली जाईल.

गांजाची नशा किती वेळ राहते? संशोधनात महत्वाची माहिती आली समोर, जाणून घ्या

आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना 18 ऑक्टोबरला अनुदान रक्कम वितरित करण्याची शक्यता आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

तीन टप्प्यांत मिळणार अनुदान

1) शेतकऱ्यांची पहिली यादी - 8.29 लाख
अनुदानची रक्कम - 4,000 कोटी

2) शेतकऱ्यांची दुसरी यादी - 10 लाख
अनुदानाची रक्कम - 5,000 कोटी

3) शेतकऱ्यांची तिसरी यादी - 4.85 लाख
अनुदानाची रक्कम - 1,200 कोटी

महत्वाच्या बातम्या 
सरकारची मोठी घोषणा; साखरेसाठी प्रतिकिलो फक्त 20 रुपये मोजावे लागणार
दिलासादायक! गुग्गुळ औषधी वनस्पती लागवडीसाठी सरकार देतंय एकरी 48 हजार रुपयांचे अनुदान
झुम शेतीमधून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; जाणून घ्या 'या' पद्धतीविषयी

English Summary: Farmers incentive subsidy 50 thousand three phases allotment process
Published on: 16 October 2022, 02:56 IST