Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. या योजनांसाठी सरकार मोठे अनुदान देखील देते. आता आपण जिल्हा परिषद कृषी विभागाने कृषी योजणांसाठी जाहीर केलेल्या निधीबाबत माहिती जाणून घेणार आहोत, जी शेतकऱ्यांना उपयुक्त पडेल.

Updated on 26 September, 2022 4:29 PM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. या योजनांसाठी सरकार मोठे अनुदान देखील देते. आता आपण जिल्हा परिषद कृषी विभागाने (Department of Agriculture) कृषी योजनांसाठी जाहीर केलेल्या निधीबाबत माहिती जाणून घेणार आहोत, जी शेतकऱ्यांना उपयुक्त पडेल.

कृषी विभागाच्या (Department of Agriculture) विविध योजनांसाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने 2022-23 या वर्षासाठी 83 लाखांचा निधी जाहीर केला आहे. या 83 लाखांच्या निधीतून 12 योजना राबविण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी (farmers) दिलासादायक बातमी म्हणजे, या निधीतून शेतकऱ्यांना कीटकनाशके, पॉवर स्प्रे, ग्रास कटर, ताडपत्री, प्लॅस्टिक क्रेट, नारळ शिडी, डिझेल इंजिन, विद्युत पंप, पीव्हीसी पाइप यासह इतर काही योजनांसाठी तब्बल ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे.

भारीच की! ही एकच भाजी सर्व आजारांवर करतेय मात; एकदा खाऊन पहाच...

विशेष म्हणजे कोरोनाबाधीत (corona) मृत व्यक्तीच्या वारसदारांना या योजनांमध्ये प्राधान्य देण्यात येणार असल्याचे धोरण जिल्हा परिषदेने ठरविले आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी २८ सप्टेंबरपूर्वी कृषी विभागाकडे प्रस्ताव द्यावा. कारण प्राप्त प्रस्तावांना २ ऑक्टोबरला (octomber) मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुरी देणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुधीर चव्हाण यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी खास योजना; आता पोस्ट ऑफिसच्या किसान विकास योजनेत शेतकऱ्यांचा पैसा होणार डबल

या 12 योजनांसाठी इतका निधी वितरित

1) कीटकनाशके - २ लाख
2) पोर्टेबल पॉवर स्प्रे - १० लाख
3) नॅपसॅक स्पेअर - २ लाख
4) ग्रास कटर - ४२ लाख
5) प्लॅस्टिक ताडपत्री - ५ लाख
6) प्लॅस्टिक क्रेट - ३ लाख
7) नारळ शिडी - २ लाख
8) डिझेल इंजिन - ४ लाख
9) विद्युत पंप ८ लाख
10) पीव्हीसी पाइप - ३ लाख
11) वणवा - २ लाख

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हरभरा, ज्वारी, करडईच्या बियाण्यांवर मिळणार 'इतके' अनुदान
घरसबसल्या सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला होईल 5 लाख रुपयांची कमाई
LIC ची भन्नाट योजना; फक्त 2 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार 48 लाख रुपयांचा परतावा

English Summary: Farmers 75 percent subsidy 12 Yojana 83 lakhs fund announced
Published on: 26 September 2022, 04:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)