Government Schemes

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. आता केंद्र सरकारकडून आणखी योजना राबविली जाणार आहे. 'पंतप्रधान भारतीय जन खत अभियान - एक देश एक खत' या नव्या योजनेअंतर्गत खताची विक्री केली जाणार आहे.

Updated on 18 October, 2022 2:57 PM IST

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. आता केंद्र सरकारकडून आणखी योजना राबविली जाणार आहे. 'पंतप्रधान भारतीय जन खत अभियान - एक देश एक खत' (One country one fertilizer) या नव्या योजनेअंतर्गत खताची विक्री केली जाणार आहे.

या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. या योजनेअंतर्गत 'भारत' या एकाच ब्रॅन्डखाली अनुदानित खतांची विक्री करण्याचे बंधनकारक केले आहे. पीएम किसान सन्मान संमेलन (PM Kisan Samman Sammelan) 2022 या दोन दिवसीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या खताच्या ब्रॅन्डचे अनावरण करण्यात आले आहे.

पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; हरभरा आणि गहू बियाणे अनुदानावर मिळणार

संपूर्ण देशामध्ये युरिया, डीएपी, एमओपी आणि एनपीके खतांची या एकाच ब्रॅन्ड (brand) खाली विक्री केली जाणार आहे. याचा फायदा म्हणजे खतांत होणारी भेसळ आणि जड मालवाहतुकीवर देण्यात येणारे अनुदान घटविण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे.

धक्कादायक! पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याकडे पैशांची मागणी

600 नवीन पीएम किसान समृद्धी केंद्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 600 नवीन पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचे उद्घाटन केले. या केंद्रांवर केवळ खतच उपलब्ध होणार नाही. तर बियाणे, उपकरणे, माती परीक्षण आणि शेतकऱ्याशी संबंधित सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 
सावधान! दिवाळीचा फराळ वर्तमानपत्रावर ठेवू नका; होऊ शकतात गंभीर आजार, जाणून घ्या
तुती लागवडीतून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; रोपवाटीकेचे करा असे नियोजन
मोदी सरकारने आखला मोठा प्लॅन! बी-बियाणे, खते व माती परीक्षणाची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध

English Summary: Comforting Subsidized fertilizers sold under Bharat brand Farmers
Published on: 18 October 2022, 02:53 IST