सरकार शेतकऱ्यांना (farmers) आर्थिक दृष्ट्या मजबूत बनविण्यासाठी अनेक योजना राबवत असते. ज्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. या योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान मानधन (Pradhan Mantri Kisan Mandhan) योजनेचा समावेश आहे. या योजनेला किसान पेन्शन योजना म्हणून देखील ओळखले जाते.
ज्या शेतकऱ्यांना (farmers) आपले भविष्य सुरक्षित करायचे आहे. अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना उपयोगी पडू शकते. किसान मानधन योजनेत शेतकरी 200 रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात.
त्यानंतर शेतकऱ्यांना वयाच्या 60 व्या वर्षी 3000 रुपये दरमहा पेन्शन दिली जाईल. वय वर्ष 18 ते 40 वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेमध्ये आतापर्यंत देशातील 19 लाख 23 हजार 475 शेतकरी सामील झाले आहेत.
शेतकऱ्यांनो हरभरा पिकाची पेरणी 'या' तारखेपासून सुरू करा; मिळेल भरपूर उत्पादन
पात्रता
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा देशातील 18 ते 40 वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी लाभ (Farmer benefits) मिळवू शकतात. देशातील ज्या शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा जमीन आहे, तेच शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतील. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अठरा वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना दरमहा फक्त 22 रुपये जमा करावे लागतील.
तर, 30 वर्षाच्या शेतकऱ्यांसाठी ही रक्कम 110 रुपयापर्यंत वाढते. तर वयाच्या 40 व्या वर्षी किसान मानधन योजनेचा लाभ केल्यावर दरमहा 200 रुपये जमा करावे लागेल. यानंतर शेतकऱ्यांना सरकारकडून साठ वर्षानंतर दरमहा 3000 रुपये म्हणजेच वार्षिक 36,000 रुपये पेन्शन दिली जाईल.
'या' सहा राशींवर असणार एक महिन्यापर्यंत सूर्यग्रहणाचा प्रभाव; कसे कराल रक्षण? जाणून घ्या
या योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना PM किसान मानधन योजनेच्या अधिकृत पोर्टल https://pmkmy.gov.in/ ला जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल किंवा प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन अर्ज करू शकता.
आवश्यक कागदपत्रे
स्वतःचे आधार कार्ड, ओळखपत्र, वयाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या
आता दुधाचे उत्पादन होणार दुप्पट; 'या' जिल्ह्यात राबविण्यात येणार आनंद पॅटर्न प्रकल्प
सावधान! पुढील दोन दिवस 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मिळणार महत्वाची सुविधा
Published on: 27 October 2022, 03:07 IST