Government Schemes

लोकांना कर्ज घेण्यासाठी बँकांच्या अनेक पायऱ्या चढाव्या लागतात. येरझाऱ्या माराव्या लागतात. कर्ज घेण्यासाठी लोकांना अनेक दिवस बँकांमध्ये जावे लागते. अनेक वेळा क्रेडिट स्कोअर (Credit score) नसल्यामुळे बँका कर्ज देण्यास नकार देतात.

Updated on 23 September, 2022 1:31 PM IST

लोकांना कर्ज घेण्यासाठी बँकांच्या अनेक पायऱ्या चढाव्या लागतात. येरझाऱ्या माराव्या लागतात. कर्ज घेण्यासाठी लोकांना अनेक दिवस बँकांमध्ये जावे लागते. अनेक वेळा क्रेडिट स्कोअर (Credit score) नसल्यामुळे बँका कर्ज देण्यास नकार देतात.

त्यामुळे आज आपण अशा एका योजनेविषयी (scheme) माहिती घेणार आहोत, ज्या अंतर्गत तुम्ही कोणत्याही हमीशिवाय कर्ज (loan) घेऊ शकता.

महत्वाचे म्हणजे या कर्जावर तुम्हाला दरमहा व्याजही भरावे लागणार नाही, त्यामुळे तुम्हाला या योजनेची माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर उपयोगी पडेल.

25 सप्टेंबरपासून 'या' राशींच्या लोकांचे सोनेरी दिवस सुरु होणार; वाचा तुमचे राशीभविष्य

तुम्ही अगदी कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज देखील मिळवू शकता, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याची परतफेड करण्यासाठी दरमहा EMI भरण्याची गरज नाही. या सर्व सुविधा तुम्हाला एलआयसी पॉलिसीवर (policy) मिळतात. यासाठी तुम्हाला एलआयसी कार्यालयात जावून भेट घ्यावी लागेल.

LIC कडे LIC जीवन विमा पॉलिसी हमी म्हणून आहे, त्यामुळे तुम्हाला 3 ते 5 दिवसांत कर्ज देखील मिळू शकते. तुम्ही एलआयसीच्या पॉलिसीवर कर्ज घेतल्यास तुम्हाला वार्षिक फक्त 10 ते 12 टक्के व्याज मिळेल. म्हणजेच, मासिक व्याज 1% किंवा कमी आहे. तर बाजारात 13 ते 18 टक्के दराने कर्ज मिळू शकते.

'या' बाजारसमितीत सोयाबीनला मिळाला सर्वाधिक बाजारभाव; जाणून घ्या

तुम्हाला दरमहा व्याज भरावे लागणार नाही

या कर्जांसाठी तुम्हाला मासिक EMI भरण्याची आवश्यकता नाही. विमा पॉलिसीच्या (vima policy) मुदतपूर्तीपर्यंत किमान सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज घेता येते. आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की तुम्‍हाला किमान 6 महिन्यांच्‍या कालावधीत कर्ज बंद करायचं असल्‍यावरही तुम्‍हाला संपूर्ण 6 महिन्यांच्‍या कालावधीसाठी व्‍याज भरावे लागेल. त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा. या कर्जाअंतर्गत तुम्ही वार्षिक व्याज जमा करू शकता.

महत्वाच्या बातम्या 
पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; दरवर्षी मिळणार 1 लाख 11 हजार रुपये
सरकारकडून तेलबियांच्या लागवडीला प्रोत्साहन; 8 लाख बियाणांचे मिनीकिट्सचे शेतकऱ्यांना मोफत वाटप
गव्हाच्या 'या' ३ जाती शेतकऱ्यांना करतील मालामाल; फक्त १२० दिवसात देतील तब्बल ९० क्विंटल उत्पादन

English Summary: Cibil score LIC plan farmers opportunity farmers
Published on: 23 September 2022, 01:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)