केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. आता पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी देखील सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
आता देशी गाई आणि म्हशींच्या जाती पेक्षा इतर संकरित जातींचे पालन मोठ्या प्रमाणात केले जाते. असे असताना भारतातील मूळ किंवा देशी गोवंश तसेच म्हशींच्या जाती आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे त्यावर काम करणे सरकारकडून सुरू करण्यात आले आहे.
आता देशी गाई आणि म्हशीच्या जातींचे संवर्धन करण्यासाठी शासनाने एक कल्याणकारी योजना देशभरात लागू केली आहे. केंद्रीय दुग्धव्यवसाय मंत्रालयामार्फत गोपाल रत्न पुरस्कार (Gopal Ratna Award) सोहळा आयोजित केला जाणार आहे.
२४५० रुपये FRP बसत असताना २५०० रुपये भाव देण्याचे जाहिर केल्यानुसार कारखाना लवकरच उर्वरित दर देणार
यामध्ये या प्रजातींचे संवर्धन-प्रोत्साहन करण्यात येणार आहे. या शेतकरी बांधवांना (Livestock Farmer) पाच लाखांपर्यंतची पुरस्कार रक्कम देखील देण्यात येणार आहे. यामुळे आता देशी गाई आणि म्हशींचे संगोपन करणाऱ्या पशुपालकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
तसेच यामुळे देशी गाई आणि मशीन चे संवर्धन देशात मोठ्या प्रमाणात होऊ शकणार आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून आता अर्ज मागवले आहेत. शेतकरी बांधव या योजनेसाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीस परवानगी मिळणार? बैलगाडा चालकांची मागणी
यासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार अंतर्गत अर्ज करण्यासाठी भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइट https://awards.gov.in वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. या पुरस्कारासाठी शासनाने ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागवले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
जमिनीचे भूसंपादन नाही शेतकऱ्यांना पैसे नाहीत, तरीही महामार्ग तयार
शेतकरी आता पीक नुकसानीचा स्वताच पंचनामा करणार, कोणीही राहणार नाही मदतीपासून वंचीत
मेहंदी शेतीतून करोडोंची कमाई, प्रत्येक ऋतूमध्ये मागणी असणारे एकमेव पीक
Published on: 28 September 2022, 03:42 IST