शेतकऱ्यांना शेतीमध्ये विविध कामांसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारकडून विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो व या लाभाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या विविध पीक लागवड असो की तंत्रज्ञानाचा वापर किंवा एखादा व्यवसाय करणे सोपे जाते. शेतकरी शेती करत असताना विविध प्रकारचे जोड धंदे करतात. या जोडधंदा पैकी पशुपालन हा एक प्रमुख जोडधंदा असून यामध्ये वाढीव दुध उत्पादन शेतकऱ्यांचे महत्वाचे उत्पन्नाचे साधन असते.
अशा दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय,पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडून राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराच्या उद्देश हा आहे की देशी गाई व म्हशींच्या जातीना प्रोत्साहन मिळावे हा होय.
या पुरस्काराचे नेमके स्वरूप
केंद्र सरकारचे मत्स्यव्यवसाय,पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय भारतातील जे काही सर्वोत्कृष्ट डेरी फार्म आहे त्यांना हा पुरस्कार देणार आहे.
यामध्ये देशातील जे सर्वात उत्कृष्ट डेरी फार्म आहेत त्यांना पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. यासाठी सर्वात उत्कृष्ट शेतकरी निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
या पुरस्काराचे वितरण हे 26 नोव्हेंबर म्हणजेच राष्ट्रीय दूध दिनाचे औचित्य साधून करण्यात येणार आहे. हा पुरस्कार डेरी क्षेत्रातील सर्वोत्तम सरकारी पुरस्कार आहे. याअंतर्गत देशी गाई/म्हशींचे संगोपन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट दूध उत्पादकाला पाच लाख रुपये दिले जातील.
सर्वात उत्कृष्ट कृत्रिम रेतन तंत्रज्ञ यांना तीन लाख आणि सर्वोत्कृष्ट डेरी सहकारी संस्था,दूध उत्पादक कंपनी आणि दुग्ध उत्पादक शेतकरी संघटनेला दोन लाख रुपये दिले जातील तसेच स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र दिले जाते.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची मुदत 15 सप्टेंबर 2022 असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
यासाठीच या अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच https://awards.gov.in या माध्यमातून अर्ज करू शकता. या संकेतस्थळावरच तुम्हाला या योजनेविषयी अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज सादर करण्याची पद्धत तुम्हाला कळू शकते.
यासाठीची पात्रता
1- यामध्ये गाईंच्या 50 जाती आणि म्हशीच्या सतरा त्यापैकी कोणत्याही मान्यताप्राप्त देशी जातींचे देखभाल करणारे शेतकरी या पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र आहे
2- राज्य/ केंद्रशासित प्रदेश पशुधन विकास मंडळ, राज्य/ दूध महासंघ / एनजीओ आणि इतर खासगी संस्थांचे AI तंत्रज्ञान ज्यांनी किमान 90 दिवसांचे AI प्रशिक्षण घेतले आहे यासाठी अर्ज करू शकतात.
3- एक सहकारी संस्था/ दूध उत्पादक कंपनी/ शेतकरी उत्पादक संस्था/ गाव पातळीवर स्थापन केलेल्या दुग्ध व्यवसायात गुंतलेली आणि सहकारी कायदा/ कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी करत आहे आणि दररोज किमान शंभर लिटर दूध संकलन करते आणि किमान 50 शेतकरी सदस्य आहेत अशा संस्था
नक्की वाचा:Good News: 'या' राज्यात नवीन कापसाला मिळाला 'इतका' भाव,नवीन कापसाची आवक सुरू
Published on: 27 August 2022, 02:49 IST