Government Schemes

कोरोनानंतर सरकार गरीब कुटुंबांना मोफत रेशन योजनेचा लाभ देत आहे. सध्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ५ किलो मोफत धान्य दिले जात आहे. आता सरकारने नवीन वर्षापासून 81.35 कोटी लोकांना एका वर्षासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे, जी आजपासून लागू होणार आहे.

Updated on 03 January, 2023 9:59 AM IST

कोरोनानंतर सरकार गरीब कुटुंबांना मोफत रेशन योजनेचा लाभ देत आहे. सध्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत ५ किलो मोफत धान्य दिले जात आहे. आता सरकारने नवीन वर्षापासून 81.35 कोटी लोकांना एका वर्षासाठी मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे, जी आजपासून लागू होणार आहे.

केंद्र सरकार 1 जानेवारीपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत डिसेंबर 2023 पर्यंत 81.35 कोटी लोकांना मोफत रेशनचा लाभ देणार आहे. अन्न मंत्रालयाने सांगितले की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत, सर्व NFSA लाभार्थ्यांना वितरित केल्या जाणार्‍या रेशनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. यासाठी केंद्र सरकार 2023 सालासाठी 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त अन्न अनुदान उचलणार आहे.

अन्न मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की केंद्राची नवीन अन्न सुरक्षा योजना 1 जानेवारी 2023 पासून सुरू होत आहे. या योजनेअंतर्गत 2023 पर्यंत NFSA अंतर्गत येणाऱ्या 81.35 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले जाईल. सरकारने सांगितले की ही योजना NFSA चे प्रभावी आणि एकसमान कार्य सुनिश्चित करेल.

मोलॅसिस विक्रीची रक्कम शेतकऱ्यांना द्या, प्रत्येक उपपदार्थांच्या विक्रीचा नफा शेतकऱ्यांना मिळणार, सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा

केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या रेशनसाठी आतापर्यंत लाभार्थ्यांना एक ते तीन रुपये मोजावे लागत होते. एप्रिल 2020 मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशनही देण्यात आले. आता एका वर्षासाठी या लोकांना केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या रेशनवर एक रुपयाही देण्याची गरज भासणार नाही.

३६० ट्रॅक्टर, ७० पोकलेन आणि डझनभर जेसीबी, फडतरीची झाली एक वेगळीच ओळख

पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना लाभ दिला जात होता, परंतु 31 डिसेंबर 2022 रोजी तो बंद करण्यात आला. आता नवीन योजनेअंतर्गत, NFSA, अंत्योदय अन्न योजना (AAY) कुटुंब आणि प्राधान्य कुटुंब व्यक्ती या दोघांनाही लाभ दिले जातील. प्राधान्य कुटुंब श्रेणीसाठी प्रति व्यक्ती सुमारे 5 किलो प्रति महिना वाटप केले जाईल, तर NFSA अंतर्गत प्रदान केलेल्या अंत्योदय अन्न योजना कुटुंबांसाठी प्रति कुटुंब 35 किलो प्रति महिना रेशन दिले जाईल.

महत्वाच्या बातम्या;
तीतर पालनातून करा लाखोंची कमाई, शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर..
लग्नात वाजवले फटाके आणि उसाला लागली आग, ६ लाखाचे नुकसान..
शेतकऱ्यांनो जास्त उत्पन्न काढा, पण पत्रकारांना उत्पन्न सांगू नका, शरद पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला

English Summary: Center's decision give free ration poor benefit 81 crore citizens
Published on: 03 January 2023, 09:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)