Government Schemes

रब्बी हंगामात शेतकरी गहू आणि हरभरा लागवड मोठ्या प्रमाणात करतात. रब्बी हंगामासाठी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र आणि राज्य शासनामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि कृषी उन्नती योजनेंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

Updated on 18 October, 2022 10:01 AM IST

रब्बी हंगामात शेतकरी गहू आणि हरभरा लागवड मोठ्या प्रमाणात करतात. रब्बी हंगामासाठी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्र आणि राज्य शासनामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (National Food Security Scheme) आणि कृषी उन्नती योजनेंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि कृषी उन्नती या दोन्ही योजनेंतर्गत शेतकऱ्यांना हरभरा आणि गहू प्रमाणित बियाणे अनुदानावर मिळणार आहे. हरभरा व गहू बियाणे महाबीज विक्रेत्याकडे उपलब्ध राहणार आहेत.

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना (farmers) मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. हरभरा व गहू प्रमाणित बियाणे उपलब्ध असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, अशी माहिती महाबीजचे विभागीय व्यवस्थापक विनोद पाटील यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळबाग लागवडीसाठी सरकार देतंय 100 टक्के अनुदान

प्रति क्विटल अनुदान व अनुदानित विक्री दर

10 वर्षाच्या आत मधील हरभरा वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान 2 हजार 500 रुपये राहणार आहे आणि यासाठी अनुदानित विक्री दर 4 हजार 500 रुपये आहे. 10 वर्षावरील हरभरा वाणासाठी प्रती ‍क्विंटल अनुदान -2 हजार रुपये राहणार आहे यासाठी अनुदानित विक्री दर 5 हजार राहणार आहे.

पोस्ट ऑफिसमधील FD वर बँकेपेक्षा मिळणार जास्त व्याजदर; जाणून घ्या

10 वर्षाच्या आत मधील हरभरा काबुली वाणासाठी अनुदान- 2 हजार 500 राहणार असून अनुदानित विक्री दर 8 हजार 500 रुपये आहे. 10 वर्षावरील हरभरा काबुली वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान - 2 हजार राहणार आहे आणि यासाठी अनुदानित विक्री दर - 9 हजार रुपये आहे.

10 वर्षाच्या आत मधील गव्हाचा (gram and wheat) वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान 1 हजार 500 असून अनुदानित विक्री दर - 2 हजार 500 रुपये तर 10 वर्षावरील गव्हाचा प्रती क्विंटल अनुदान 1 हजार 500 असून अनुदानित विक्री दर 2 हजार 700 रुपये आहेत. या प्रकारे हरभरा व गहू बियाण्यांसाठी प्रती क्विंटल अनुदान व अनुदानित विक्री दर असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 
Horoscope: येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
दिलासादायक! पहिल्या टप्प्यात 37 हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ
दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; वारणा सहकारी दूध संघाकडून मिळणार ५४ कोटी रुपये

English Summary: Big relief rain-affected farmers Gram wheat seeds will be available subsidy
Published on: 18 October 2022, 09:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)