केंद्र सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये दिले जातात. अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. असे असताना आता किसान योजनेत (PM Kisan installment ) नोंदणीसाठी रेशन कार्ड ( Ration card ) अनिवार्य करण्यात आले आहे. पीएम किसान पोर्टलवर शिधापत्रिका क्रमांक टाकणे अनिवार्य झाले आहे. तुमच्या नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणे तुमच्यासाठी अनिवार्य असणार आहे.
तसेच रेशन कार्डच्या अनिवार्य गरजेसह, नोंदणी दरम्यान, केवळ कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी (पीडीएफ) बनवाव्या लागतील आणि पोर्टलवर अपलोड कराव्या लागतील. तसेच मागील हप्त्यापासून शेतकऱ्यांसाठी केवायसीही अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारकही रद्द करण्यात आले आहे. आता लाभार्थ्यांना या कागदपत्रांची पीडीएफ फाइल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे.
आता बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य आहे कारण सरकार DBT द्वारे शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित करते. बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. यासाठी पीएम किसानच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर तुमची कागदपत्रे अपलोड करा. आधार लिंक करण्यासाठी तुम्ही फार्मर कॉर्नरच्या पर्यायावर जा आणि आधार तपशील संपादित करा या पर्यायावर क्लिक करून अपडेट करावी लागणार आहेत. आता हे पैसे कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शेती हा बांधावरुन करण्याचा विषय नाही तर..., बिजमाता राहिबाईंचा मोलाचा सल्ला
अनेक शेतकऱ्यांना ११ हप्ता मिळाला नाही, त्यांना आता पुढील हप्त्यासोबत मागील रक्कमही मिळणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना आता एकदम ४ हजार रुपये मिळणार आहेत. ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी नोंदणी केली आहे. जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला असेल आणि काही कारणास्तव तुमचा हप्ता अडकला असेल तर तुम्हाला ४ हजार रुपये मिळतील.
महत्वाच्या बातम्या;
मोदींचे २ हजार मिळाले नसतील तर थेट 'या' नंबरवर फोन करून करा चौकशी, लगेच मिळतील पैसे...
आता लाल मुंग्याची काळजी करू नका! 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
वय ७८ पण कामाचा तोच जोश आणि तोच उत्साह!! आजींकडून भात उत्पादनासाठी शेतीची मशागत
Published on: 25 June 2022, 12:38 IST