Government Schemes

राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक लागवडीखालील पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. दरम्यान शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून आता मनसे पुढे सरसावली आहे.

Updated on 26 July, 2022 11:29 AM IST

राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक लागवडीखालील पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. दरम्यान शेतकऱ्यांना (farmers) मदतीचा हात म्हणून आता मनसे पुढे सरसावली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या (farmers) मदतीला पुढे आली असून 'राजसाहेब ठाकरे अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजना' (Rajsaheb Thackeray Small Landholding Farmer Adoption Scheme) सुरू केली आहे. या योजनेचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

राजसाहेब ठाकरे अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजना

वणी, मारेगाव आणि झरीजामनी या तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज (bank loan) घेऊन खरिपाची लागवड केली. सुरुवातीला पाणी न आल्याने दुबार पेरणी करावी लागली. तर आता अतिवृष्टी झाल्यामुळे नदीला पूर येऊन शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली.

हे ही वाचा 
Today Horoscope: 'या' ५ राशींच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

त्यामुळे शेतकऱ्यांवर असमानी आणि सुलतानी अशी दोन्ही संकटे ओढावली आहेत. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे सरसावली आहे. राजसाहेब ठाकरे अल्पभू-धारक शेतकरी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेचा हेतु स्पष्ट आहे. पुरामुळे ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना रब्बी हंगामात उभारी मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

हे ही वाचा 
Petrol-Diesel: पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठे बदल; जाणून घ्या आजचे नवीन दर

यामुळे या भागातील जवळपास 600 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे, खते, कीटकनाशके, यासह इतर शेतीसाहित्य शेतकऱ्यांना घरपोच नेऊन देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 
Planting vegetables! शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात करा 'या' भाज्यांची लागवड; मिळेल भरघोस उत्पन्न
Fertilizer news; शेतकऱ्यांनो सावधान! खतामध्ये केली चक्क मिठाची भेसळ, चोरांनो कुठं फेडचाल हे पाप..
Cultivation of jojoba! जोजोबा शेतीतून शेतकरी होणार मालामाल; जाणून घेऊया हे पीक कसे पिकवणार..

English Summary: Big announcement farmers MNS ground
Published on: 26 July 2022, 11:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)