अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना (farmers) आर्थिक लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुरेपूर पर्यंत करत असते. याचेच उदाहरण म्हणजे तब्बल पावणेदोन लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा नुकसान भरपाई देण्यात आली आहे.
आतापर्यंत 3 जिल्ह्यांतील पावणेदोन लाख पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. पंतप्रधान पीक विमा (crops insurance) योजनेत सहभागी झालेल्या अधिसूचित नुकसानग्रस्त महसूल मंडळांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी अधिसूचना जारी करतात आणि यानंतर पंचनामा होऊन पात्र शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येते. मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान होऊन अधिसूचना जारी झालेले एकूण जिल्हे 15 आहेत. त्यातील गोंदिया, कोल्हापूर व जालना जिल्ह्यातील 1,41,450 शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे.
झुम शेतीमधून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; जाणून घ्या 'या' पद्धतीविषयी
भरपाईपोटी 'एचडीएफसी इर्गो' विमा कंपनीने 44.97 कोटी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले आहे. उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये भरपाई निश्चित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. 'एचडीएफसी'च्या क्षेत्रातील 27 तालुक्यांमधील 91 महसूल मंडळांमद्धे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढण्यात आली आहे.
यामधील 55 मंडलांना भरपाई देण्यासाठी कंपनीने पात्र ठरविले होते. त्यानुसार भरपाईपात्र शेतकऱ्यांची जिल्हानिहाय संख्या व रक्कम ठरविण्यात आली आहे. गोंदिया 7779 शेतकरी (2.32 कोटी रुपये), कोल्हापूर 319 (12.30 लाख रुपये), जालना 134362 शेतकरी (43.76 कोटी रुपये).
दिलासादायक! गुग्गुळ औषधी वनस्पती लागवडीसाठी सरकार देतंय एकरी 48 हजार रुपयांचे अनुदान
15 जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केलेल्या तालुक्यांची संख्या 191 आहे. या तालुक्यांमधील 921 मंडलांमधील सर्वेक्षण व भरपाई वितरणाची जबाबदारी मात्र अजून नुकसान भरपाई न दिलेल्या महसूल मंडलांची जिल्हानिहाय संख्या चंद्रपूर 30, परभणी 8, नागपूर 222, अकोला 24, वर्धा 147, अमरावती 80, लातूर 6, उस्मानाबाद 15, गडचिरोली 13, सोलापूर 31, नांदेड 284 इतकी आहे.
महत्वाच्या बातम्या
LIC ची 'ही' योजना खूपच खास; फक्त एकाच गुंतवणुकीवर मिळणार दरमहा 15 हजारांपर्यंत रक्कम
शेतकऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान तीन टप्प्यात मिळणार; जाणून घ्या वाटप प्रक्रिया
सरकारची मोठी घोषणा; साखरेसाठी प्रतिकिलो फक्त 20 रुपये मोजावे लागणार
Published on: 16 October 2022, 04:56 IST