Government Schemes

आता सरकारने सर्व सोलारपंप अर्जांना मंजूरी देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. 2019 पासूनचे कृषी पंपाचे पेड पेंडिंग आहे. जवळपास सव्वा लाख लोकांनी कृषी पंपासाठी अर्ज केला आहे.

Updated on 13 July, 2022 4:54 PM IST

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यामुळे आता सरकारने सर्व सोलारपंप अर्जांना मंजूरी देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे. 2019 पासूनचे कृषी पंपाचे पेड पेंडिंग आहे. जवळपास सव्वा लाख लोकांनी कृषी पंपासाठी अर्ज केला आहे.

यामुळे या शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. त्या सगळ्यांना केंद्र सरकारची कुसुम योजना आणि राज्य सरकारच्या योजनेच्या अंतर्गत पुढच्या सहा महिन्यात पंप देऊन शेतकऱ्यांची गरज पूर्ण केली जणार आहे. तसेच आता उपसा सिंचन योजना सोलरवर कशा टाकता येतील हे देखील पाहिले जाणार आहे त्यामुळे सोलर वीज केल्यास बचत करता येईल.

तसेच शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून दिवसाची वीज देण्याची मागणी करत होते. अनेकांनी यासाठी आंदोलन देखील केले होते. रात्रीच्या विजेमुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आज मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

याला म्हणतात खरी कृतज्ञता!! बेंदूर सणादिवशी बैलांचा त्रास कमी होण्यासाठी तयार केले अनोखे जुगाड

शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज मिळत नव्हती. काही शेतकऱ्यांचे वीज बिल भरले नसल्यामुळे कनेक्शन तोडण्यात आले होते. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली होती. तसेच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात होते. यामुळे शेतकरी आक्रमक झाला होता. मात्र आता त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
... आणि डोळ्यासमोर आख्ख गाव वाहून गेलं! राज्यात पावसाचा हाहाकार
video: गाईने खाटिकाला दिली भयंकर शिक्षा, दोरीने बांधल्यामुळे फरफटत नेल, आणि...
अवघडच झालं! पैसे वाटूनही सरपंचपदाची निवडणूक हरले, मतदारांकडून पुन्हा केली ४ लाखाची वसुली

English Summary: all solar pump applications approval, decision of Shinde government
Published on: 13 July 2022, 04:54 IST