रेशनकार्डधारकांसाठी (ration) ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. शिधापत्रिकाधारकांवर मोठी कारवाई करत सरकारने गेल्या काही दिवसांत सुमारे अडीच कोटी शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. आता याबाबत पुन्हा एक नवीन महत्वाचा निर्णय घेतला आहे.
धान्यावरचा हक्क सोडण्याच्या आवाहनास प्रतिसाद न दिलेल्या अशा लोकांचा म्हणजेच रेशन कार्डधारकांचा थेट शोध घेण्यात येणार आहे. अशी माहिती शासनाने (government) दिली आहे.
वाढत्या महागाईच्या काळात गोरगरीब जनता व मध्यमवर्गीयांना रेशनिंगचा मोठा आधार वाटत आहे. पण अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांपैकी अनेक जण 59 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न दाखवून शासनाची फसवणूक करत आहेत, असे शासनाचे म्हणणे आहे.
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! फक्त 417 रुपये गुंतवा आणि मिळवा 1 कोटी रुपये
1 सप्टेंबर 2022 पासून उच्च उत्पन्न असणार्या व्यक्तीचे धान्य बंद करून आजपर्यंत घेतलेल्या धान्याची वसुली बाजारभावाप्रमाणे केली जाईल व शासनाची फसवणूक केल्याबद्दल कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
विशेष म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत (september) मुदतवाढ देऊनही अनेकांनी अजूनही धान्याचा लाभ सोडलेला नाही. त्यामुळे माहितीनुसार आता अशा रेशनकार्डधारकांची थेट शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.
अरे व्वा! फळमाशीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शेतकऱ्याने केला भन्नाट जुगाड
परिमंडळ कार्यालयाच्या वतीने महापालिका आयुक्त, प्रमुख कंपन्या यांच्याकडून अधिकारी, कर्मचार्यांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यात अधिकारी, कर्मचार्यांचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, रेशन कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर आदीचा समावेश आहे.
आयकर विवरणपत्र भरणारे, डॉक्टर, वकील, अभियंते, चारचाकी गाडी असणारे, ज्यांचे स्वतःचे घर अथवा शेती आहे, परदेश दौरा केला असेल त्यांनी रेशनवरील धान्याचा हक्क सोडला पाहिजे. अशी माहिती शासनाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
LIC च्या जीवन सरल योजनेत दरवर्षी मिळणार ५२ हजार रुपये; घ्या असा लाभ
हाडांना भरपूर कॅल्शियम देणारे हे पदार्थ दररोज खा; हाडं होतील मजबूत
सर्व राशींच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Published on: 18 September 2022, 11:41 IST