केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी (farmers) नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून पीक विमा योजना राबविली जाते.
नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यात मोठा पाऊस झाला होता. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे या जिल्ह्यातील 717 कोटी 88 लाख रुपयांचा निधी वितरण्यास सुरुवात केला आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.
या अतिवृष्टीचा फटका तब्बल 7 लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांना बसला. यात 5 लाख 27 हजार 491 हेक्टर क्षेत्रावरील जिरायती, बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी 717 कोटी 8 8लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे.
बापरे बाप! तब्बल 10 कोटींची म्हैस; पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
हा निधी शेतकऱ्यांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. जिल्ह्याला यापूर्वीच 8 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार इतर जिल्ह्याच्या अगोदर निधी (fund) मिळाला. एकूण जिल्ह्यास 717 कोटी 88 लाख रुपये निधी प्राप्त झाला. या निधीचे जिल्हा बँकेच्या माध्यमातून वाटप सुरू असल्याचे देखील श्री. चलवदे यांनी कळविले आहे.
शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड; 2 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 273 कोटी नुकसान भरपाई जमा
तालुकानिहाय वितरित निधी
नांदेड- 25 कोटी 89 लाख, अर्धापूर -29 कोटी 16 लाख, कंधार -55 कोटी 12 लाख, लोहा 61 कोटी 5 लाख, देगलूर 41 कोटी 95 लाख, मुखेड 54 कोटी 70 लाख, बिलोली- 40 कोटी 35 लाख, नायगाव- 45 कोटी 5 लाख, धर्माबाद- 29 कोटी 53 लाख, उमरी- 40 कोटी 11 लाख, भोकर- 52 कोटी 43 लाख, मुदखेड- 24 कोटी 27 लाख, हदगाव-85 कोटी 20 लाख, हिमायतनगर- 42 कोटी 74 लाख, किनवट-67 कोटी 9 लाख, माहूर- 22 कोटी 20 लाख.
महत्वाच्या बातम्या
‘या’ राशींसाठी दिवस असणार आनंददायी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
तब्बल 10 लाख शेतकऱ्यांची पिकविमा रक्कम रखडली; शेतकरी प्रतीक्षेत
आता लाइटचे नो टेंशन! फुकटात वीज निर्माण करणारा जनरेटर लॉन्च, होणार असा फायदा
Published on: 21 October 2022, 09:06 IST