Government Schemes

ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे 40 कोटी 53 लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार हा निधी जिल्हा प्रशासनाकडे आला आहे.

Updated on 27 September, 2022 3:39 PM IST

ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे (farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे 40 कोटी 53 लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार हा निधी जिल्हा प्रशासनाकडे आला आहे.

या निधीतून उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि बार्शी या चार तालुक्यातील २८ हजार ६६ आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना (farmers) येणाऱ्या दोन दिवसात मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. या निर्णयाचा दिलासा नक्कीच शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शेतकऱ्यांनो कमी कालावधीत बक्कळ पैसा कमवायचा आहे? तर प्लायमाउथ रॉक कोंबडीचे पालन कराच...

यावर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून खऱ्या अर्थाने पाऊस सुरु झाला. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्याचा जोर अधिक वाढला होता. या दरम्यान बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या चार तालुक्यात अतिवृष्टी (heavy rain) होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे.

पशूपालकांसाठी महत्वाची बातमी! जनावरांच्या आहारातील कॅल्शिअमचे प्रमाण तपासा, अन्यथा...

आपण पाहिले तर अगोदर २५ हजार हेक्टर आणि नंतरही याच भागात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ६२ हजार हेक्टरला फटका बसला. पहिल्या टप्प्याच्या मदतीपोटी त्याचवेळी पिकांचे पंचनामे करून ४० कोटी ५३ लाखाचा प्रस्ताव प्रशासनाने शासनाकडे पाठवला.

त्यानंतरच्या नुकसानीसाठी पुन्हा ६० कोटी रुपये असा एकूण १०० कोटीचा प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४० कोटीचा निधी मिळाला आहे, येत्या दोन दिवसात प्रत्येक तहसीलस्तरावरुन गावपातळीवर शेतकऱ्य़ांच्या (farmers) खात्यात हे पैसे जमा होणार असल्याचे सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो घरबसल्या सुरू करा बटाटे आणि तांदळापासून 'हा' भन्नाट व्यवसाय; जाणून घ्या सविस्तर
'या' घरगुती उपायांनी दूर करा शरीरातील थकवा आणि अशक्तपणा; जाणून घ्या
आता तुमची पेन्शन तुम्हाला ठरवता येणार; एलआयसीची सरल पेन्शन योजना देतेय मोठी संधी

English Summary: 40 crore fund approved farmers amount deposited account next 2 days
Published on: 27 September 2022, 03:39 IST