Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबवत असते. ज्यामधून त्यांना आर्थिक चांगला लाभ मिळेल. सध्या आरोग्य विम्याकडे बऱ्याच लोकांचा कल वाढला आहे. मात्र आरोग्य विमा घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? याविषयी आपण जाणून घेऊया.

Updated on 31 October, 2022 12:29 PM IST

यावर्षी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. त्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या विभागातील तब्बल अतिवृष्टीमुळे 29 लाख शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

माहितीनुसार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 2 हजार 479 कोटी लागणार आहेत. विशेष म्हणजे यासंबंधीचा सविस्तर अहवाल महसूल विभागाने राज्य शासनास पाठविला देखील आहे.

अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस या पिकांबरोरच खरिपाच्या अन्य पिकांना फटका बसला आहे. बागायती शेती आणि फळबागांचेही नुकसान झाले आहे.

धक्कादायक! 'या' जिल्ह्यात साडेतीन हजार पेक्षा अधिक जनावरांना लम्पीचा प्रादुर्भाव

मराठवाड्यातील 28 लाख 76 हजार 816 शेतकऱ्यांना निसर्गाची झळ सोसावी लागली. सर्वाधिक झळ बीड जिह्यातील 7 लाख 87 हजार 799 शेतकऱ्यांना बसली आहे. या जिह्यातील 4 लाख 78 हजार 327 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

नोव्हेंबर महिन्यात 'या' राशीच्या लोकांचे उजळणार भविष्य; उत्पन्नात होणार चांगली वाढ

अतिवृष्टीने नुकसान, अपेक्षित निधी

संभाजीनगर - 6,79,056 शेतकरी, 62,810 शेतकरी
जालना - 5,67,826 निधी रक्कम 57,547 शेतकरी
परभणी - 4,61,407 निधी रक्कम, 29,798 शेतकरी
हिंगोली - 54,8,76 निधी रक्कम, 16,81 शेतकरी
नांदेड - 49,8,85 निधी रक्कम, 29,24 शेतकरी
बीड - 7,87,799 निधी रक्कम, 65,053 शेतकरी
लातूर - 16,9,48 निधी रक्कम, 2044 शेतकरी
धाराशिव -2,59,019 निधी रक्कम, 26,076 शेतकरी
एकूण - 28,76,816 निधी रक्कम, 2479,32 शेतकरी

महत्वाच्या बातम्या 
काय सांगता! या झाडाची साल, लाकूड, पाने विकून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; वाचा...
सावधान! आरोग्य विमा घेताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा होईल आर्थिक नुकसान
दिलासादायक! 2 हजार 552 पशुपालकांच्या खात्यावर 6 कोटी रुपयांची रक्कम जमा

English Summary: 29 lakh farmers hard heavy rains Farmers waiting compensation assistance
Published on: 31 October 2022, 12:19 IST