Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. आज आपण अशाच एका योजनेविषयी बोलणार आहोत. ज्याचा अधिक लाभ शेतकऱ्यांना होईल. जलजीवन मिशन योजनेविषयी बोलत आहोत.

Updated on 04 October, 2022 11:07 AM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार (state government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. आज आपण अशाच एका योजनेविषयी बोलणार आहोत. ज्याचा अधिक लाभ शेतकऱ्यांना होईल. जलजीवन मिशन योजनेविषयी बोलत आहोत.

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात सोलर पॅनलवर (solar panels) चालणाऱ्या तब्बल 202 योजना मंजूर झाल्या आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. यामधील 41 योजना कऱ्हाड तालुक्यातील आहेत. या योजना सौरऊर्जेवर चालणार असल्याने गावोगावच्या वीजबिलांचाही प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे.

शेतकऱ्यांनो लवंग, वेलची 'या' मसाला पिकांची शेती करून कमवा लाखों रुपये; जाणून घ्या

महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागात पिण्याचे शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने गावागावांत प्रत्येक घरात नळ जोडणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाकडून जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे २०२४ पर्यंत 'हर घर जल से नल' हे घोषवाक्य डोळ्यासमोर ठेवत प्रत्येकाला पाणी उपलब्ध करून देणार अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

शेतीकामासाठी सर्वोत्तम भारतातील टॉप 5 ट्रॅक्टर; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

या योजनेतील कामासाठी केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा आहे. त्यानुसार गावोगावी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत ग्रामीण भागात, तर शहरी भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा योजनांची (scheme) कामे सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या 
दिलासादायक! सौर पंपासाठी तब्बल १५ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर
वृषभ, कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस मौज मजेचा; जाणून घ्या संपूर्ण राशींचे राशीभाविष्य
दिलासादायक! जेष्ठ नागरिकांसाठी 'या' बँकेने लाँच केली नवीन FD स्कीम; मिळणार तब्बल 8.40 % व्याज

English Summary: 202 schemes running solar panels approved Satara district Farmers benefit
Published on: 04 October 2022, 11:05 IST