Government Schemes

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) राबविली जाते. आता या योजनेबाबद सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे.

Updated on 20 August, 2022 11:02 AM IST

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजना (Crop Insurance Scheme) राबविली जाते. आता या योजनेबाबद सरकारने एक दिलासादायक निर्णय घेतला आहे.

सरकारने प्रशासकीय पातळीवरील पीएम किसान (pm kisan) योजनेच्या खर्चासाठी निधी मंजूर केला आहे. हा निधी तब्बल 19 कोटी 69 लाख रुपये इतका आहे. हा निधी सरकारने सरकारी पातळीवरील कार्यालयीन व अन्य आवश्यक कामांसाठीच मंजूर केला आहे.

Farmer Award: शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मिळणार पुरस्कार; करा असा अर्ज

प्रधानमंत्री पीक विमा योजना 2022 व रब्बी हंगाम 2022-23 या वर्षासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी एर्गो इन्शुरन्स कंपनी (HDFC Egro Insurance Company), आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स (ICICI Lombard General Insurance), बजाज जनरल इन्शुरन्स (Bajaj General Insurance) आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स (United India Insurance) या 5 कंपन्यांमार्फत राबविण्यात येत आहे.

Post Office Scheme: पोस्टाची 'ही' योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; 5 वर्षात मिळणार 14 लाख रुपये

कंपन्यांनी प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. कृषी विभागाच्या मदतीने कामकाज सुरू आहे. प्रशासकीय पातळीवरील कामकाजासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी कृषी आयुक्तांनी पत्र पाठवले होते. त्यानुसार सरकारने निधी मंजूर केला आहे.

जवळपास 19 कोटी 69 लाख 27 हजार 96 रुपये इतका निधी मंजूर केला आहे. या निधीतून प्रशासकीय कामकाजाचा खर्च भागविण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणी करणार्‍या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी आता आधिक जबाबदारीने काम करणे अपेक्षित आहे.

महत्वाच्या बातम्या 
Animal Husbandry: पशुपालकांनो शेेळ्या-मेंढ्यांची 'अशी' काळजी घ्या; पशुसंवर्धन विभागाने दिल्या महत्वाच्या सूचना
Micro Irrigation Scheme: सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्यांना 55 टक्क्यांपर्यंत अनुदान; असा घ्या लाभ
Horoscope: 21 ऑगस्टपासून 'या' राशीच्या लोकांना होणार मोठा धनलाभ; वाचा तुमचे राशीभविष्य

English Summary: 19 crore 69 lakh rupees government crop insurance
Published on: 20 August 2022, 10:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)