पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेचे आतापर्यंत 13 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. आता लवकरच शेतकऱ्यांना योजनेचा 14वा हप्ता मिळणार आहे. असे मानले जाते की मे महिन्यात सरकार पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकू शकते.
तुम्ही पात्र शेतकरी असाल आणि अद्याप योजनेत नोंदणी केली नसेल, तर ते लवकर पूर्ण करा. PMKSNY मधील नोंदणीकृत शेतकऱ्यांनी e-KYC (PM Kisan e KYC) आणि जमीन पडताळणीचे काम देखील केले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळू शकतील. लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षभरात 6,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते.
ते प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिले जाते. पीएम किसानचे हे हप्ते थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात. हे हप्ते एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च महिन्यात पाठवले जातात.
जांभळाला किलोला मिळाला ६०० ते ७०० रुपयांचा दर, मागणी वाढली..
तुम्हाला पीएम किसानचा 14 वा हप्ता घ्यायचा असेल, तर तुमचे ई-केवायसी पूर्ण असले पाहिजे. तुम्ही अजून KYC केले नसेल तर ते लवकर करा. शेतकरी त्यांच्या जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन किंवा PM किसान पोर्टल pmkisan.gov.in वर जाऊन ई-केवायसी करू शकतात.
मोचा' चक्रीवादळ किनारपट्टीला धडकणार, ११ ते १५ मे पाऊस पडणार
पीएम किसानचा 14 वा हप्ता मिळविण्यासाठी जमिनीची पडताळणी करणे देखील आवश्यक आहे. जर ते नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता मिळू शकणार नाही. लाभार्थी शेतकरी त्यांच्या जवळच्या कृषी कार्यालयात जाऊन जमीन पडताळणी करू शकतात.
खजूर शेती आहे खूपच फायद्याची, खजुराचे एक झाड देते हजारो रुपयांचे उत्पन्न, शेतकरी काही वर्षात करोडपती
कर्नाटकमध्ये मोफत सिलेंडर, व्याजमुक्त कर्ज, भाजपचे शेतकऱ्यांना अच्छे दिन?
पाऊस घेणार विश्रांती, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा, पंजाब डख यांनी सांगितली तारीख
Published on: 03 May 2023, 10:24 IST