PM Kisan Yojana: देशातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) केंद्र सरकारने (Central Goverment) अनेक योजना हळू केल्या आहेत. त्यातील एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही आहे. यातून शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६००० हजार रुपये दिले जातात. या योजनेचा हेतू शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर ३ हफ्त्यांमध्ये पैसे जमा केले जातात.
दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये पाठवले जातात
या योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात (Farmers Bank Account) दोन हजार रुपये वर्ग केले जातात. आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 11 हप्ते वर्ग केले आहेत. आता शेतकरी बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच हा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे.
हे शेतकरी 12 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात
ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. जर शेतकऱ्यांनी या तारखेपूर्वी त्यांचे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केले नाही तर ते १२व्या हप्त्यापासून (12th installment) वंचित राहू शकतात. याशिवाय ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना चुकीचा डेटा भरला आहे, तेही या योजनेपासून वंचित राहू शकतात. अशा परिस्थितीत अशा लोकांना धक्का बसू शकतो.
वांग्याच्या शेतीतून होईल बंपर कमाई! फक्त या तीन जातींची करा निवड व्हाल मालामाल
पुढचा हप्ता कधी येणार?
पीएम किसान योजनेच्या पुढच्या म्हणजेच १२व्या हप्त्याबद्दल बोलायचे झाले तर लवकरच करोडो शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. वास्तविक, सरकार पुढील हप्ता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवू शकते.
शेतकऱ्यांनो पीक रोटेशननुसार करा शेती, एका पिकानंतर पुढचे पीक कोणते घ्यायचे, जाणून घ्या..
अवैध लाभार्थ्यांना नोटीस
अनेक दिवसांपासून पंतप्रधान किसान योजनेचा बेकायदेशीरपणे फायदा घेत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. हे करणार्यांवर सरकार कडक झाले आहे. सरकारकडून अशा लोकांना पैसे परत करण्यासाठी नोटीस पाठवली जात आहे. तत्काळ पैसे परत न केल्याने या लोकांवरही कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात आले.
महत्वाच्या बातम्या:
बळीराजाला नुकसान भरपाईची आस! खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण...
केळी उत्पादकांचे अच्छे दिन! केळीला विक्रमी भाव...
Published on: 09 August 2022, 03:37 IST