Farm Mechanization

सध्या शेतीमध्ये अनेक अमुलाग्र बदल होत आहेत. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर होत आहे. शेतीच्या प्रत्येक कामासाठी उपयोगी असणारे मुख्य अवजार म्हणजे ट्रॅक्टर (tractor) .

Updated on 03 October, 2022 5:12 PM IST

सध्या शेतीमध्ये अनेक अमुलाग्र बदल होत आहेत. यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर होत आहे. शेतीच्या प्रत्येक कामासाठी उपयोगी असणारे मुख्य अवजार म्हणजे ट्रॅक्टर (tractor) .  

ट्रॅक्टर ही शेतकऱ्यांसाठी (farmers) शान असे म्हंटले जाते. शेतीच्या जवळपास सर्वच कामामध्ये ट्रॅक्टरचा वापर केला जातो.

महत्वाचे म्हणजे मजूरटंचाई अधिक वाढत असल्याने शेतीमध्ये ट्रॅक्टरचा उपयोग देखील चांगलाच वाढू लागला आहे. विशेष म्हणजे ट्रॅक्टरच्या वापराने कमी वेळेत शेतातील कामे होतात आणि कमी मेहनतीत तुम्ही चांगले उत्पादन घेऊ शकता. 

अनेक ट्रॅक्टर कंपन्या या भारतीय बाजारपेठेत सर्वोत्तम मॉडेल लाँच (launch) करत असतात. शेतकरी मित्रांनो तुम्ही नवीन ट्रॅक्टर (Tractor Information) घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते. भारतातील टॉप 5 ट्रॅक्टर विषयी आपण माहिती जाणून घेऊया. 

सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना फटका; गहू, पीठ, तांदूळ दरात मोठी वाढ

1) फार्मट्रॅक 60 क्लासिक EPI T20 ट्रॅक्टर 

फार्मट्रॅक कंपनी ही देशातील अग्रगण्य ट्रॅक्टर निर्माती कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचा फार्मट्रॅक 60 क्लासिक EPI T20 ट्रॅक्टर सध्या टॉपवर धावत आहे.

फार्मट्रॅक 60 क्लासिक EPI T20 ची भारतीय बाजारपेठेत किंमत 7.00 ते 7.25 लाख रुपये आहे. ही एक्स शोरूम किंमत आहे. त्यामुळे ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.

2) महिंद्रा 475 DI XP Plus 

महिंद्राचा Mahindra 475 DI XP Plus ट्रॅक्टर सध्या बाजारात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे 42 अश्वशक्तीसह येते. त्याचे शक्तिशाली हायड्रॉलिक विविध उपकरणांसह सहजतेने कार्य करतात.

Mahindra 475 DI XP Plus ची भारतीय बाजारपेठेत किंमत 5.75 ते 6.10 लाख रुपये आहे. या ट्रॅक्टरची देखील ही एक्स शोरूम किंमत असून ऑन रोड प्राईस यापेक्षा अधिक राहणार आहे.

3) जॉन डियर 5310 

जॉन डीरे 5310 ट्रॅक्टर तिसऱ्या क्रमांकावर आहे. यात उच्च इंजिन बॅकअप असल्याची माहिती मिळाली आहे. यात 9 फॉरवर्ड आणि 3 रिव्हर्स सिंक्रोमेश/कॉलर शिफ्ट ट्रान्समिशन आहेत. John Deere 5310 ची भारतीय बाजारात किंमत 7.89 ते 8.50 लाख रुपये आहे.

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत FD पेक्षा जास्त परतावा; घ्या असा लाभ

4) सोनालिका 745 DI III सिकंदर 

सोनालिका 745 DI III सिकंदर हा भारतात चौथ्या क्रमांकावर ट्रॅक्टर (tractor) आहे. यात 50 HP चे इंजिन देखील आहे. हा एक विश्वासार्ह ब्रँड मानला जातो. दीर्घकाळ चालणाऱ्या कामासाठी हा खूप चांगला ट्रॅक्टर आहे. सोनालिका 745 DI III सिकंदरची भारतीय बाजारपेठेत किंमत 5.70 ते 6.30 लाख रुपये आहे.

5) मॅसी फर्ग्युसन 1035 DI

ट्रॅक्टरच्या यादीत आपण पाहिले तर मॅसी फर्ग्युसन 1035 DI पाचव्या क्रमांकावर आहे. हे 36 एचपी इंजिनसह येते. हे ट्रॅक्टर जड वजन वाहून नेण्यासाठी डिझाइन केलेले आहे. Massey Ferguson 1035 DI ची भारतीय बाजारपेठेत किंमत ₹ 5.20 ते 5.65 लाखांपर्यंत आहे.

महत्वाच्या बातम्या 
शेतकऱ्यांनो लवंग, वेलची 'या' मसाला पिकांची शेती करून कमवा लाखों रुपये; जाणून घ्या
सामान्य गव्हापेक्षा काळ्या गव्हाची किंमत 4 पट जास्त; शेतकरी होणार मालामाल
आहारात या 6 फळांचे सेवन करा; रक्ताच्या नसा साफ होतील, हार्ट अटॅकचा धोखाही टळेल

English Summary: Top 5 Best Tractors India Farming price features
Published on: 03 October 2022, 05:05 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)